व्यसन सोडा, समाज घडवा!:माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्यसन सोडा, समाज घडवा!:माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन

Share This
व्यसन मुक्ती समाज मंदिरा करिता हातपंम्प चे भूमिपूजन.
खबरकट्टा /गडचिरोली (सेवा वाकडोतपवार:
ता.प्रतिनिधी अहेरी)


व्यसन सोडा आणि नवा समाज घडवा असे आवाहन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी महागाव (खुर्द) येथे केले.

     
ते राष्ट्रसंत प.पु.शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना  महागाव तर्फे शनिवार 23 फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन शिबीर व  बोरवेल खोदाई भूमीपूजना प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलत होते. 
     
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू भैय्या हकीम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महागाव खुर्दचे  सरपंच श्रीहरी आलम, महागाव बुजुर्गचे सरपंच विनायक वेलादी, रा.काँ.महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, जेष्ठ नागरिक नागोजी आत्राम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
     
पुढे उदघाटनीय स्थानावरून बोलतांना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, कोणतेही व्यसन हे मनुष्यासाठी हानिकारक असून व्यसनातून कर्करोग व अन्य दुर्धर  आजार होतात. व्यसनांमुळे समाज मागे जात असून प्रत्येकांनी व्यसनमुक्त होऊन एक नवा समाज घडवावा असे आवाहन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी करून खरे तर व्यसन हेच विषारी महारोग असून  व्यसनावरील दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीतुन जिवनाला वरदान यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन  केले.


     
अध्यक्षीय स्थानावरून बबलू भैय्या हकीम यांनी, व्यसन हे केवळ व्यक्ती किंवा शरीराला ईजा पोहचवीत नसून पूर्ण संसार बरबाद व उध्वस्त करीत आहे व्यसन हाच महाभयंकर रोग असून व्यसनापासून प्रत्येकांनी दूर व सावध राहावे असे म्हणत विविध उदाहरणासाहित व्यसन मुक्तीचे महत्त्व पटवून दिले.
    
प्रास्ताविकातून व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष गजानन रामटेके यांनी व्यसनांमुळे चारित्र्य खराब होते व तसेच मनुष्याचे आयुर्मान कमी होते समाजात त्याला कमी लेखल्या जाते असे म्हणत परमपूज्य शेषराव महाराज यांच्या आशीर्वादाने मी पूर्णतः व्यसन मुक्त झाल्याचे आवर्जून सांगून व्यसनमुक्तीचे महत्व सांगितले. 
     
तत्पूर्वी प. पूज्य शेषराव महाराज यांच्या मंदिरासाठी बोरवेल्स उभारण्यात येणार असून या बोरवेल्स खोदाईचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते  व याचवेळी मंदिरासाठी जागा दान केल्याबद्दल दामाजी सडमेक यांचेही सत्कार करण्यात आले. 
     
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश करमे यांनी तर उपस्थितांचे आभार कमलाबाई ईनमवार  यांनी मानले. यशस्वीतेसाठी अमोल मुक्कावार,   चेतन दुर्गे,काशीनाथ मेश्राम, दामाजी सडमेक, भिमराव दुर्गे, दामाजी दुर्गे, वामनजी श्रीकोंडावार, गिरमाजी सडमेक, श्यामला आलम, हरिदास सडमेक आदींनी सहकार्य केले. सदर व्यसनमुक्ती कार्यक्रमात युवा वर्ग, युवती, महिला व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.