दोन बायका अन फजिती ऐका !!! : आमदारांच्या दोन बायकांत फ्री स्टाईल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन बायका अन फजिती ऐका !!! : आमदारांच्या दोन बायकांत फ्री स्टाईल

Share This
खबरकट्टा / यवतमाळ प्रतिनिधी :
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदार संघाचे भाजपा आमदार प्रा.राजू तोडसाम यांच्या दोन्ही बायकांत फ्री स्टाईल बघायला मिळाली.

 पांढरकवडा बायपास रोडवर काल सायंकाळी तोडसाम यांची आई आणि पहिली पत्नी यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोबत शाब्दिक बाचाबाचीवरून सरळ मारहाण केली. सदर घटना बघून रस्त्यावरील दोन्ही बाजूची रहदारी थांबली होती. नंतर समज दिल्यानंतरही निवळत नसल्याने पोलीस स्टेशन पर्यंत धाव घेण्यावर गेले. अद्याप कोणत्याही गटावर गुन्हा नोंदविण्यात आला नसून दुसऱ्या पत्नीने हाणामारीची लेखी तक्रार केली असल्याचे समजले.समज देऊनही उपयोग न झाल्याने आमदार महोदयांनी शांततेचा पवित्रा घेतला आहे. 

येत्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा दौरा असल्याने या घटनेमुळे कार्यकर्ते व स्थानिकांत भाजप पदाधिकाऱ्यांची चांगली नाच्चकी झाली व कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.