बबन उरकुडे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र : शेकडो शिवसैनिकांसह शेतकरी संघटनेत प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बबन उरकुडे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र : शेकडो शिवसैनिकांसह शेतकरी संघटनेत प्रवेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके /राजुरा):

शिवसेनेचे माजी राजुरा तालुका प्रमुख व येथील तडफदार नेते बबन उरकुडे यांचे नेतृत्वात राजुरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य,शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख व पंचविस गावातील शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पुष्पगुच्छ व संघटनेचा लाल बिल्ला लावून या सर्वांचे स्वागत केले.

        
उध्दव मंगल कार्यालय येथे १६ फेब्रुवारीला शेतकरी संघटनेची तालुका बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अँड. वामनराव चटप होते. सभेत सर्वप्रथम काश्मीर येथे शहीद झालेल्या जवानांना दोन मिनीट मौन राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.
           
या सभेत प्रमुख अतिथी प्रभाकर दिवे,अरुण नवले, मुरलीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे,अनिल ठाकुरवार,रमेश नळे,तेजस्विनी कावळे, चंद्रकला ढवस, कवडू पोटे,नारायण गड्डमवार,प्रभाकर ढवस,अँड. राजेंद्र जेनेकर,पंढरी बोंडे, शब्बीर जागीरदार, दिनकर डोहे,हरीदास बोरकुटे,आबाजी ढवस,बंडू माणूसमारे, शेषराव बोंडे,अनंता येरणे इ. सह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
          
ग्रामीण भागाचा विकास, शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी सतत संघर्ष करणारे आणि लोकाभिमुख व जागरूक नेतृत्व माजी आमदार अँड वामनराव चटप यांचे असुन आपण लहानपणापासुन त्यांची शेतकरी व समाजाप्रती असलेली बांधिलकी  बघत असुन त्यांच्या नेतृत्वाची आपल्याला गरज असल्याचे मत बबन उरकुडे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी बबन उरकुडे यांनी शिवसेना सोडून शेतकरी संघटनेत प्रवेश केल्याबद्दल अँड. चटप यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 


त्यांचेसोबत युवासेनेचे उपतालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर, आसिफ शेख,मिथुन नुलावार,प्रविण जाधव, ग्रामपंचायत सदस्य रमेश झाडे,बंडू आईलवार,मारोती महाकुलकर,अर्जुन आत्राम,वंदना मुसळे व सुवर्णा महाकुलकर,गिता खोके,लक्ष्मी उईके ( सर्व ग्रामपंचायत सदस्य ) यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यशिवाय अशोक पडगिलवार,महेश झाडे,राजेश गौरकार, मंगेश पहानपटे, वसंत नवघरे, सुरज पादे, सुधाकर कुंभे,मनोज कुरवटकर,सुर्यभान मोरे,अंकुश वडस्कर, राजु लोणारे,कविता पारखी,कांचन महाकुलकर,आशा उरकुडे, मंदा साळवे,तारा मडावी, अर्चना कपारे, विमल मुंडाले,कांता साळवे,प्रविणा पारखी यांचेसह राजुरा,रामपूर,अंतरगाव,आर्वी, गोयेगाव,भुरकुंडा, कढोली,धिडशी,बाबापूर, खामोना,पाचगाव,खांबाडा,पांढरपौनी, सोनुर्ली यासह राजुरा तालुक्यातील पंचविस गावातील शिवसेनेच्या शेकडो युवा   कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पुष्पगुच्छ देऊन व संघटनेचा लाल बिल्ला लावून स्वागत केले.
       

यावेळी बोलतांना अँड. चटप म्हणाले की,आर्थीक स्वातंत्र्याची लढाई समजून घेऊन त्यासाछी लढण्यास आता तरुणांनी सिध्द झाले पाहिजे. शेतक-यांच्या घामाच्या लढाई आता निर्णायक टप्प्यात असून यापुढील संघर्ष तरुण यशस्वीपणे पुढे नेतील, असा आशावाद व्यक्त करीत त्यांनी देशापुढील अनेक समस्या, शेतकरी समाजाचे प्रश्न, तालुक्याच्या समस्या, वेगळ्या विदर्भाची भूमिका, शेतमालाचे भाव, प्रचलित कायदे याविषयी आपल्या भाषणात सविस्तर विचार मांडले.

बैठकीचे संचालन कपील इद्दे व आभारप्रदर्शन मधुकर चिंचोलकर यांनी केले. सभेला तालुक्यातील कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. बैठकीची सांगता शेतकरी संघटनेची शपथ व घोषणा देऊन झाली.