सुरक्षा दलांना कारवाईसाठी खुली सूट : पांढरकवडा सभेत पंतप्रधानांचे प्रतिपादन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुरक्षा दलांना कारवाईसाठी खुली सूट : पांढरकवडा सभेत पंतप्रधानांचे प्रतिपादन

Share This
खबरकट्टा / यवतमाळ :

पुलावामामधील दहशतवाद्यांच्या कृत्यांनतर आपला आक्रोश मी समजू शकतो. दहशतवादी आणि त्यांच्या आकांना योग्य शिक्षा केली जाईल. सुरक्षा दलांना कारवाईसाठी खुली सूट दिली गेली आहे, असे  प्रतिप्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे सकाळी एकलव्य मॉडेल स्कूलचे उद्घाटन झाले. तसेच प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. अजनी (नागपूर) ते पुणे रेल्वेचा ई-शुभारंभ, ग्रामोन्नती योजनेतील लाभार्र्थींना धनादेशाचे वाटप करण्यात आले.  त्यानंतर त्यानी बचतगटांच्या मेळाव्यास मार्गदर्शन केले. या वेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  विमानतळावर आगमन झाले.  विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर ते  हेलिकॉप्टरनं यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा साठी रवाना झाले. 

नांदेड इथल्या एकलव्य आदर्श निवासी शाळेचे बटण दाबून उद्‌घाटन झाले. या शाळेची 420 विद्यार्थ्यांची एकूण क्षमता आहे. या शाळेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीही मदत होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवडक लाभार्थींच्या ई-गृहप्रवेशासाठी पंतप्रधानांच्या हस्ते या लाभार्थींना घराच्या किल्ल्या प्रदान करण्यात आल्या. 

नागपूर-अजनी-पुणे दरम्यान धावणाऱ्या या गाडीला व्हिडिओ लिंकद्वारे पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवला. या गाडीला थ्री टायर वातानुकूलित डबे राहणार आहेत.