पोलीस निरीक्षक श्री जयवंत चव्हाण यांनी दिला माणुसकीचा परिचय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पोलीस निरीक्षक श्री जयवंत चव्हाण यांनी दिला माणुसकीचा परिचय

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पदभार 1 महिन्यापूर्वी श्री जयवंत चव्हाण पोलीस निरीक्षक यांनी स्वीकारला. वाहतूक शाखेच्या पार्किंग शेडमध्ये अनेक महिन्यापासून  म्हातारा वेडा व्यक्ती राहत असल्याचे त्यांना दिसले.


त्यांनी याबाबत विचारणा केली असता तेथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी तो बऱ्याच महिन्यापासून येथे राहत आहे व घरी जात नाही असे सांगितले. लगेच पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांनी एक नाव्ही बोलावून त्याची कटिंग व दाढी करून घेतली, आंघोळ घातली, त्याला नवीन कपडे आणले, जेवू घातले. त्याच्या घराविषयी चौकशी केली असता तो चंद्रपूर येथे राहत असून त्याची मुले नागपूर येथे राहत असल्याची त्यांना माहिती मिळाली. 


श्री चव्हाण यांनी लगेच आपली गाडी  म्हातार्‍या वेडसर व्यक्तीच्या घरी पाठवली व त्याच्या मुलीला वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथे बोलावून घेतले. मुलगी ही आपल्या वडिलांना पाहून गहिवरली व आपल्या घरी नेण्यास तयार झाली. त्यांच्या मुलीला आपल्या वडिलांचा सांभाळ करण्याबाबत समजावून सांगितले. व ती मुलगी आपल्या वडिलाला घरी घेऊन गेली. 

एका रस्त्यावर राहत असलेल्या वेडसर म्हाताऱ्या व्यक्तीला श्री जयवंत चव्हाण पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा यांनी घर मिळवून दिले. श्री चव्हाण यांनी वर्दीच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी दाखवली व सर्व महाराष्ट्र पोलिसांना आदर्श घालून दिला. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल टीम खबरकट्टा कडून  खूप खूप शुभेच्छा.