संघटन वाढवून रा.काँ.चे 'वन बूथ टेन युथ' उपक्रम राबवा : माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संघटन वाढवून रा.काँ.चे 'वन बूथ टेन युथ' उपक्रम राबवा : माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Share This
खबरकट्टा /गडचिरोली :(सेवा वाकडोतपवार :अहेरी):

 जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा  विस्तार मोठ्या प्रमाणात करून   संघटन वाढवा आणि सक्रियरित्या कामाला लागा असा सल्ला माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.
    
ते आलापल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
  
बैठकीत  मंचावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते बबलू भैय्या हकीम, रा. काँ. महिला जिल्हाध्यक्ष सोनलिताई पुण्यपवार, रा.काँ.चे महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे,  जि.प. सदस्य ऋषी पोरतेट, उपसरपंच पुष्पाताई अलोने, फहिम काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
     
पुढे अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, सबंध राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने "वन बूथ टेन युथ" हे उपक्रम राबवित असून गडचिरोली  जिल्ह्यातही हे उपक्रम राबवून संघटन वाढवा आणि कामाला लागा असा सल्ला रा.काँ. कार्यकर्त्यांना दिले. 
     
आणि येत्या दोन दिवसात प्रत्येक तालुक्यातील बूथ कमिटीची यादी तयार करा असे स्पष्ट  सूचना कार्यकर्त्यांना केले.
     
यावेळी रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासणारा पक्ष असून पक्षाचे ध्येय धोरणे व पक्षाची चांगली मोट बांधणीसाठी बूथ कमिटी तयार करून पक्षाची मजबूत बळकटी करावे असे म्हणत योग्य मार्गदर्शन केले. 
     आढावा बैठकीचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी तर उपस्थितांचे आभार अल्ताफ पठाण यांनी मानले. यावेळी रा.काँ. पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.