चिमूर नगर परिषद च्या सिंटेक्स टाकी पाणी प्रभाग मंजूर करण्यात अनियमितता :ठरावास दिली बगल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर नगर परिषद च्या सिंटेक्स टाकी पाणी प्रभाग मंजूर करण्यात अनियमितता :ठरावास दिली बगल

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :(चिमूर  प्रतिनिधी-अरविंद राऊत)
चिमूर नगर परिषद च्या मार्फतीने प्रत्येक प्रभागात सिंटेक्स  टाकी पाणी  प्रत्येक प्रभागात सुरू करण्यासाठीचा ठराव झाला असताना मात्र अध्यक्ष गोपाल झाडे यांच्या चुकीच्या व दिशाहीन कारभाराने ठरावास बगल देत सत्ताधाऱ्या नी आपल्या मनमर्जी ने अनावश्यक ठिकाणी पाणी टाकी लावणार असल्याचा आरोप अर्थ व नियोजन सभापती सतीश जाधव यांनी केला असून संपूर्ण प्रभागात पाणी टाकी योजना लागू करण्याची मागणी केली आहे.
  
चिमूर शहराला 24 तास शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी 51 कोटी रुपयांची नगरात्योन योजनेतून मंजूर केली होती आणि योजना मोठी असल्याने महाराष्ट्र जीवन पाणी प्राधिकरण मंडळ मार्फत च्या वतीने बांधकाम करणार होते परंतु  गावाच्या विकासाच्या भूमिका लक्ष्यात न  घेता नगर परिषद मधील तत्कालीन  नगरसेवकांच्या तटस्थ भूमिकेने व विरोधी नगरसेवकांच्या विरोधाने ठराव मंजूर होऊ शकला नसल्याने योजना न्यायालयात गेली चिमुरकरा ना शुद्ध पाणी हिरावण्याचे काम केले गेले नागरिकांची दिशाभूल केली गेली 
स्वार्थ साठी काही नगरसेवक  तटस्थ राहिले होते त्यामुळे ती योजना प्रलंबित रखडली गेली.

नगर परिषद मध्ये एकूण 38 पाणी टाकी लावणार असून प्रति 1 लाख 76 हजार 880 रुपयांची तरतूद असून एकूण 67  लाख 21 हजार 440 रुपये मंजूर केले आहे मग या सिंटेक्स पाणी टाकी खरेदी पारदर्शकता आहे काय असा प्रश्न निर्माण झाला  आहे.याबाबत लवकरच चौकशी लावणार. -सभापती सतीश जाधव
    
सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कांग्रेस सत्ता आली आणि गोपाल झाडे नगराध्यक्ष झाले असून दबावात व दुसऱ्याच्या इशाऱ्यावर सत्ता कारभार करीत आहे परंतु सिंटेक्स पाणी टाकी योजना प्रत्येक प्रभागात अंमलात आणण्यासाठी ठराव मंजूर केला असताना नगराध्यक्ष यांनी दुसऱ्याच्या बोलविता धनी वरून आपल्या मर्जी तील नगरसेवक यांच्या प्रभागात सिंटेक्स पाणी टाकी लावण्यात येणार असल्याने ठरावास बगल दिली असल्याने जनतेची दिशाभूल केली आहे प्रभाग 9 नदी काठावर प्रभाग मध्ये पाणी मुबलक असताना त्या प्रभागात गरज नसतानाही दिले गेले असून तर प्रभाग 5 मध्ये सुद्धा जास्त प्रमाणात दिले गेले.