मुथा फॉउंडेशन पुणे तर्फे संपूर्ण राज्यात शालेय विद्यार्थ्यांना संस्कार मूल्यवर्धनाची शिकवणूक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुथा फॉउंडेशन पुणे तर्फे संपूर्ण राज्यात शालेय विद्यार्थ्यांना संस्कार मूल्यवर्धनाची शिकवणूक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (दिपक शर्मा - राजुरा) :
चांगला नागरिक बनण्याकरिता संस्कारमूल्याची आवश्यकता असून, संस्काराची जपणूक काळाची गरज आहे.शांतीलाल मुथा फॉउंडेशन पुणे यांनी राज्यात पहिली ते चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संस्काररूपी मूल्यांचा पाठ देण्याचे सुरु केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे मत राजुराचे नगराध्यक्ष  अरुण धोटे यांनी सदर कार्यक्रमात व्यक्त केले.

पंचायत समितीच्या गट साधन केंद्रात शांतीलाल  मुथा फॉउंडेशन पुणे व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानाने राजुरा व बल्लारपूर तहसील क्षेत्रातील शैक्षणिक उपक्रमांत महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या शिक्षक, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी यांचा सन्मान नागरध्यक्ष अरुण धोटे, पंचायत समिती सभापती सौ कुंदा जेणेकर, गट विकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामवत, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ विलास पाटील, गट शिक्षा अधिकारी पुरुषोत्तम भिवगडे, बल्लारपूर पंचायत समिती विस्तार अधिकारी वर्षा फुलझेले व राजुरा पंचायत समिती विस्तार अधिकारी शोभा कोसूरकर च्या हस्ते करण्यात आला.

शांतीलाल मुथा फॉउंडेशन चे जिल्हा अध्यक्ष अशोक संघवी यांनी प्रस्तावनेत सांगितले की, फॉउंडेशन तर्फे वर्ष 2005 पासून विद्यार्थ्यांना संस्कार मूल्यवर्धनाचा पाठ दिल्या जात असून महाराष्ट्र शासनासोबत संयुक्त रित्या 2015 पासून सात्यत्याने शिक्षादानाचे कार्य सुरु आहे. वर्ष 2018-19 मधे संपूर्ण महारष्ट्रातील 35 जिल्ह्यातील 215 तहसील क्षेत्रात 3163 केंद्रातील 22लक्ष 65 हजार 249 विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे धडे देण्यात आले असून. वर्ष 2019-20 मधे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील 408तहसील, 5576केंद्रातील 67 हजार शाळांच्या माध्यमातून 44लक्ष विद्यार्थ्यांना देण्याचे ध्येय आहे.

काल दिनांक 14फेब्रुवारीला राजुरा  संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या 132शाळा व नगरपरिषद च्या 7 शाळेतील व बल्लारपूर तालुक्यातील 27 जीप शाळा व 14 नप शाळेतील शिक्षक व केंद्र प्रमुखांना प्रोत्साहित करण्याकरिता मान्यवरांच्या हस्ते "मूल्यवर्धन प्रेरक सन्मानपत्र "देऊन सन्मान करण्यात आला

याप्रसंगी मुथा फॉउंडेशन चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अशोक संघवी, अभिषेक कास्टिया, बल्लारपूर कार्यकारणीचे संजय गुप्ता,आरती वाढोडे, डॉ सत्यनारायण टोटम, राजुरा कार्यकारणीचे तहसील अध्यक्ष प्रशांत गोठी, समन्वयक अश्विनी बोरकर, निखिल मोदी, अशोक शाह, किशोर भागवतकर, नितेश मुनोत, रुपेश जैन, आशिष जुमडे उपस्थित होते. तसेच सूत्रसंचालन पातुरकर मॅडम व आभार सुरेश सोनटक्के यांनी व्यक्त केले.