ध्येयपुर्तीसाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण कामगिरीची गरज:माजी आमदार सुभाष धोटे. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ध्येयपुर्तीसाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण कामगिरीची गरज:माजी आमदार सुभाष धोटे.

Share This
-इन्फट कान्वेंट राजुरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप. 


शालेय जीवनातील अभ्यास, अनुभव, सराव, शिस्त आणि अनुशासन माणसाच्या भावी आयुष्यासाठी, ध्येय प्राप्तीसाठी मोठी ऊर्जा बनून काम करते. कोणतेही निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक असते तेव्हाच अपेक्षित ध्येय सहज गाठता येते म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षक, पालकांचे उत्तम मार्गदर्शन आणि तळमळ लक्षात घेऊन परिश्रम घ्यावे आणि आपल्या स्वतःचे, शिक्षक व पालकांचे नाव कमावावे असे आवाहन इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे आज दिनांक ९ फेब्रुवारी २०१९ रोज शनिवारला सकाळी ठिक ०९ :१५ वाजता इयत्ता दहावीच्या  सीबीएसई आणि स्टेटच्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना केले. 
 
 प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, इन्फंट कान्व्हेंटचे स्टेट शाखेचे मुख्याध्यापक रफिक अंसारी, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, आदी मान्यवर उपस्थित होते. 

             
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अनेक विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य आणि भावपूर्ण मनोगतातून आपल्या शाळेविषयी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांविषयी भावना व्यक्त केल्या. आणि उत्तम कामगिरीची हमी दिली.
         
कार्यक्रमाचे संचालन गारवा करमनकर आणि  राणी दचांदेकर या विद्यार्थीनींनी केले तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी खंडाळे हिने केले. 
कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि  विद्यार्थी  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.