अशोक चव्हाणांचा दूरध्वनी : वामनराव चटप यांना कॉंग्रेसची उमेदवारी ???? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अशोक चव्हाणांचा दूरध्वनी : वामनराव चटप यांना कॉंग्रेसची उमेदवारी ????

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा / विशेष):
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांच्यापुढे कॉंग्रेस नेत्यांनी प्रस्ताव ठेवला आहे.

परंतु शेतकरी संघटनेचे पाईक असलेल्या वामनराव चटप यांनी कॉंग्रेस नेत्यांना हिरवा कंदिल दाखविलेला नसल्याने कॉंग्रेस नेते दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. जिल्ह्यातील गटबाजीच्या राजकारणाने कॉंग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. 

विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यातील गटबाजीने कॉंग्रेसचे संघटन मोडकळीस आले आहे. एकेकाळच्या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात आता उमेदवारासाठी कॉंग्रेसला दुसऱ्या पक्षातील नेत्यांची चाचपणी करावी लागत आहे. 

चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांच्या विरोधात असलेल्या असंतोषाचा फायदा घेण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. यासाठी एक पाऊल पुढे करून शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप यांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही चटप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कॉंग्रेसची उमेदवारी घ्यावी, अशी विनंती केल्याचे समजते.