गोंडपिपरी नगरपंचायतीच्या सभापती निवडीत भाजपच्या विजयाच्या आशा पल्लवीत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरी नगरपंचायतीच्या सभापती निवडीत भाजपच्या विजयाच्या आशा पल्लवीत

Share This
-अल्पावधीतच काँग्रेसचे पानिपत
खबरकट्टा / विशेष : गोंडपिपरी 

गोंडपिपरी येथील नगरपंचायतीवर विद्यमान स्थितीत काँग्रेस-सेनेची सत्ता आहे.येत्या ५ फेब्रुवारीला विषय समितीच्या सभापती पदासाठी निवड पार पडणार आहे.त्यात मात्र काँग्रेसचे पानिपत होणार असल्याचे चित्र असून भाजपाचेच सभापती विराजमान होणार असल्याने काँग्रेसचे नगरपंचायतीवरील तडजोडीचे राजकारण आता संपुष्टात आल्यागत स्थिती झाली आहे.

गोंडपिपरी नगरपंचायतीवर निर्मितीनंतर पहिल्यांदा भाजपकडे सत्ता होती.या कालावधीत बऱ्यापैकी विकासकामे झाली.राज्याचे वित्त व नियोजन आणि जिल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात गोंडपिपरी शहराची विकासाकडे वाटचाल सुरू झाली.असे असले तरी नगरपंचायतीच्या अडीच वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले.आणि अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसचा"हात"धरला.

यामुळे नगरपंचायतीवर अध्यक्ष काँग्रेसचा बसला खरा मात्र पुरेसे संख्याबळ काँग्रेसला कायमचे न टिकवता आल्याचे चित्र असून येत्या ५ फेब्रुवारीला विषय समित्यांच्या निवडीत काँग्रेसची गोची होणार आहे.सर्व विषय समित्यांसाठी आज(दि.१)समिती गठीत करण्यात आली.सदर समितीत भाजपचेच नगरसेवक असून विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीमध्ये भाजपाचाच विजय पक्का मनाला जात आहे.यासाठी केवळ घोषानेची औपचारिकता बाकी आहे.

यावरून सत्तासमिकरनाम्यान असलेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी त्यांचा "हात"सोडल्याचे दिसून येते.