एक तरफी प्रेमाचे बळी...!! जवाबदार कौन???????(विशेष लेख : राहुल पडालवार) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एक तरफी प्रेमाचे बळी...!! जवाबदार कौन???????(विशेष लेख : राहुल पडालवार)

Share This
खबरकट्टा / विशेष : राहुल पडालवार 
हल्ली फरवरी आला की संपूर्ण युवा पिढी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा खुमारित अक्षरशः गल्लोगल्ली त हुदंड माजवतांना सर्रास दिसतात प्रेमदिवसाच्या कुणावरही कुठेही माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून प्रपोज करण्याच्या पराक्रम करतात खरंच प्रेम एक गुलाब देऊन झालं असतं तर बागेतल्या माळी ला सर्वात जास्त प्रेयसी असत्या, प्रेम दिवसाच्या आडोसा घेऊन एकतर्फी प्रेमातून किती तरी बळी मी माझ्या कॉलेज जीवनापासून बघतो आहे वाचतो आहे.


 मी कॉलेज जीवनात असतांना तरुण भारत चा युवा पुरवणी विशेष ला माध्यमा पुरवणीत लेख लिहायचा दर गुरुवार ला त्यावेळेस साधारणतः २००१ चा काळ असेल. एकतर्फी प्रेमातून सारासार विचार शक्ती हरवून बसलेल्या ओरिसा राज्यातील कटक या जिल्ह्यातील बबिता नामक बी. एस. सी. च्या विद्यार्थिनी च्या चेहऱ्यावर त्याच कॉलेज मधील मनोरंजन साहू याने प्रेम निराशेने एसिड फेकले. आजच्या या एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या दाहक अतिरेकी व हिंसाचारी वृत्तीचे चित्रण डोळ्यासमोर आले आणि पापण्या थरारल्या. मंनात विचार घेंगाऊ लागले... जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, तिचाच खून करण्याची व जिच्या सौंदर्यावर फिदा असतो, तिच्याच  चेहर्या एसिड फेकून जीव मारण्या परियत अशी विकृत मनोवृत्ती आजच्या या प्रेम विराची (!!) का  व्हावी ? प्रेम करणारी ही तरुण मंडळी एवढे उत्कृष्ट प्रेम करीत असताना एकाएकी एवढे क्रूर का होतात? ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केले त्या व्यक्तीस या जगातून नाहीसे करायचे? टींकु , अमृता ,सारिका,स्वाती,वैशाली,स्मिता,शुभांगी,पुनम व आत्ताची बबिता... व अश्याच प्रकारे आजतागायत कित्तेक नावांची गिनती वाढतच जातेय. अश्या एकतर्फी प्रेमाचा बळी असणाऱ्या युवतीच्या यादीत एका , एका, नावाची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोण जबाबदार आहे या एकतर्फी प्रेमास ?? प्रेम वीरांची अशी विकृत मनोवृत्ती का व्हावी ?? हे थांबायचे कसे, हा फार मोठा प्रश्न समाजापुढे उभा राहिला आहे. एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या हत्यांचे प्रमाण हे समाजाच्या अधोगती चे लक्षण आहे असे नुसते म्हणत बसण्यापेक्षा काही नवी पावले उचलली तर ? 
                     
आजच्या या एकतर्फी प्रेमामुळे प्रेमासारख्या पवित्रा नात्याला विकृत रूप आलेले आहे. प्रेम ही एक उदांत भावना आहे. चंद्राला पाहून सागराला भारती येते, तशी ती सूर्याला पाहून येत नाही. एखाद्या मुलीला पाहून एखाद्या मुलाच्या हृदयात प्रेमाची भारती आली तर ती अनैसर्गिक कशी मानता येईल? त्या क्षणा पूर्ता तरी तो आविष्कार खराच असतो. पण म्हणून आपले मन जिच्यावर गेले तिचेही मन आपल्यावर जडेलच, असा चमत्कार घडेलच असे कसे होईल? 
               
आपल्याला हवी तशी हवा वाहत नाही, वारा वाहत नाही, तर तिचे मन तरी वळेलच , अशी खात्री कशी देणार? अश्यावेळी "प्रेम होईना तुझ्याने, प्रेम माझे राहुदे" म्हणून विसरून जावे हा शहाणपणाचा मार्ग ठरणार आहे. ज्यांच्या हृदयात प्रेमाचा पाझर फुटलेला आहे, त्यांचा हृदयात विवेकही जागृत असणे आवश्यक आहे. 
                
आजच्या या एकतर्फी प्रेमामध्ये प्रेमिकेचा विरहाने दारू, सिगरेट,गुटखा या सारख्या दुर्वेसंनाची लागण तरुण पिढीला होत आहे. आत्महत्या, हत्त्या, समाज - समाजातील दंगली आणि त्यातून होणारी अराजगता हे सारे एकतर्फी प्रेमा चे प्रताप नाहीत काय? एखादी मुलगी आपल्याला मित्र मानत नसेल, तर आपण तिला मैत्रीण का बरे मानावे? अर्थात एकतर्फी कोणत्याही नात्याला विरोध हवा. 
              
एकतर्फी प्रेमाची बरीच कारणे असू शकतात. १) मुला मुलीमध्ये सुसंवाद नसणे २) आर्थिक विषमता, ३) शैक्षणिक विषमता,४) रंग - रूप व्यक्तिमत्व यामधील विषमता ,५) जातीय वाद , ६) वैचारिक विषमता इत्यादी. पण प्रेमात या गोष्टींना काहीही स्थान नसले तरी हल्ली परिस्तिथी पाहता प्रेम करतांना ते यशस्वी होण्याकरिता उपरोक्त बाबींचे अवलोकन अत्यावश्यक ठरते. अन्यथा प्रेम भाग होऊन निरश्या पदरी पडू शकते. आज याच  प्रेम निराशेने तरुणांच्या मानसिक तोल ढळतो. तो अमानवी कृत्ते करतात. एकतर्फी प्रेमामध्ये कधी - कधी आपल्यावर ' ती ' किंवा ' तो ' प्रेम करीत नाही म्हणून जबरदस्ती करून तिला किंवा त्याला आपला बनविण्याच्या प्रयत्न करतात. तेही जमले नाही तर ' माझी नाही तर दुसऱ्याची नाही ' या प्रकारच्या अनितींचा अवलंब करतात. एकतर्फी प्रेमातून निराशा आलेल्या व वस्तुस्थितीला विवेकाने स्वीकारणाऱ्या एका प्रेम विराचे कहाणी सांगणारे भाष्य ११ ला असताना मराठी विषयाला '  प्रेमाचा गुलकंद ' अभ्यासाला. त्यामधील नायक एका तरुणीचा प्रेमात पडतो तिला त्याचा प्रेमा बद्दल काही एक न सांगता दररोज गुलाबाचे फुल देत राहातो. ती तरुणी ही त्या फुलाचा स्वीकार चुपचाप करीत राहते. या प्रमाणे काही दिवस चालले व तो नायक त्या युवतीला विचारतो, " हे देवी, मी आपली एवढ्या दिवस आपली आराधना केली, एवढ्या आराधा नेने देवही प्रसन्न झाला असता , तर त्याचे फळ काय ? " तेव्हा ती युवती गप्प पणे घरात जाते व घरातून एक बरणी आणून त्या नायकाच्या हातात देत म्हणते , (!!) हे घ्या तुमच्या दररोज दिलेल्या फुलाचे हे एवढे गुलकंद तय्यार झाले व निघून जाते. ती बरणी घेऊन प्रेम निराशेने तो युवक '  प्रेम नको तर नको , हा गुलकंद च पुरे ' म्हणत त्याचा आस्वाद घेत निघून जातो. त्यांने या आजकालच्या प्रेम विरप्रमाने त्या युवती वर एसिड फेकले काय ? त्या युवतीचे किती सामंजस्य दाखविले. या काव्यवेचातील नायकाप्रमानेच आजचा युवक व युवती नी ही विवेक जपायला हवा . खरी प्रीती त्यागालाही प्रवृत्त करीत असते. प्रितीच्या भावनेत देहाचे आकर्षण नसते.
            
 एकतर्फी प्रेम साठी व त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नासाठी अनेक कारणे आहेत. जसे , मुलिद्वारे नकार देण्याचा पद्धतीत स्पष्टता नसणे , अश्या प्रकाराबाबत जवळच्या मैत्रिणीस वा पालका स कल्पना न देणे, युवकाला नकार न एकण्याची सवय , पुरूषी अहंकार, समाजाच्या  युवक -  युवतीच्या मैत्रिणीकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टिकोन , प्रभावित करणारे ' डर ' , ' बाजिगर ' , ' अंजाम ' या सारखे चित्रपट , शिवाय प्रेम या विषयावर येणाऱ्या चित्रपटांचा सुळसुळाट त्यातून आपलीही एक मैत्रीण असावी, या भावनेच्या युवा वर्गात वाढता प्रभाव , महाविद्यालयातून सामाजिक प्रश्नावर अभावाने होणारे कार्यक्रम , चर्चासत्र , बेरोजगारी मुळे फावला वेळ घालवण्याची प्रक्रिया नसणे या सारख्या असेन प्रश्नांना जबाबदार धरता येते. 
             खरेच , कसा सोडविणार आहोत आपण हा प्रश्न? त्या मुलीच्या आई वडिलांना दोष दिल्यास हा प्रश्न सुटेल? वयात आलेली तरुण मुलगी कुठे जाते , काय करते इकडे आई वडिलांचे काहीच कसे लक्ष नाही? मुलीला वळण लावायला नको. का , असा ठपका ठेवणाऱ्या चर्चा करून हा प्रश्न मिटेल? की चित्रपटांना दोष देऊन या प्रश्नाचे व्यापकत्व संपेल ? 
     
गुन्हा करणाऱ्या मुलाला फाशीची शिक्षा द्यायला हवी , जबर शासन व्हायलाच हवे , अश्या विचार सरणीतून या प्रश्नाचे अस्तित्व संपेल ? की , या प्रश्नाचे उत्तर , मानसशास्त्रीय चिकित्से मध्ये शोधून काढून हा प्रश्न संपेल? 
      
कदाचित सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तर या प्रश्नाचे भीषण स्वरूप थोडे सौम्म व्हायला मदत होईल, पण त्या प्रश्नाचे समुड उत्चातन होणार नाही. एकतर्फी प्रेमातून बळी. विकृत  मनोवृत्ती तून प्रवृत्त झालेला आहे. त्यामुळे समाजामध्ये मानसिक प्रबोधन होणे आवश्यक आहे. आजच्या तरुण पिढीला सिनेमाची व्याख्या ही स्वार्थ , अपेक्षा , इच्छा , आकांक्षा, अवलंबून नसते , तर ती त्यागविवेकावर अवलंबून असते , हे पटायला हवे , नव्हे पटायला हवे. 
         
आजचे वातावरण वसणांना उदिप्त करणारे आहे. अश्या वातावरणात अवांचानिय लोकांच्या वासानापा सून आपला बचाव करण्यासाठी विर वृत्तीची मानसिकता रुजविणे हाच एक मौलिक उपाय आहे. परिणामी पायातील चप्पल हातातही घ्यावी लागेल. शाळा , महाविद्यालयातून ही या विषयावर सामाजिक चिंतन व्हायला हवे. आजचा तरुण - तरुणींनी सामंजस्य दाखवायला हवे. तेव्हाच या महिला सबलीकरणा ला अर्थ येईल. व एकतर्फी प्रेमातून उद्भवणाऱ्या ' बळी यादी ' ला पूर्ण विराम मिळेल.....