राजुरा नगर परिषदेचे १४२,०००/- रुपयाचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा नगर परिषदेचे १४२,०००/- रुपयाचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
दिनांक २२ फेब्रुवारी २०१९  ला संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण अंदाजपत्रकीय सभेत राजुरा नगर परिषदेतील २०१८ -- २०१९ या वर्षीचा अंदाजपत्रक मा.  नगराध्यक्ष अरूण धोटे यांनी सभेसमोर सादर केले.  सर्वानुमते एकमताने सदर अंदाजपत्रक मान्य करण्यात आले. 

             
यामध्ये  एकुण ४३०३९९०००/- चे बजेट सादर करण्यात आले. यावर चर्चा होऊन शेवटी एकुण १४२,०००/- शिल्लकीचे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. 
            
यात शहर विकासाच्या दृष्टीने राजुरा शहर सौंदर्यीकरण करणे, ज्या ठिकाणी नव्या वस्तीमध्ये विद्युत पुरवठा नाही तेथे विद्युत पुरवठा व्यवस्था निर्माण करणे, शहरातील प्रत्येक नागरिकास घराची उपलब्धता,  आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकणे, तलाव सौंदर्यीकरण, लेआऊट विकसीकरण,  युपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासीका स्थापन करणे आणि वाचनालय अध्ययावत करणे, ओपनपेस मध्ये बाग बगीचे तयार करणे या बाबींवर विशेष भर देण्यात येणार असून शहर स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी व हागणदारी मुक्त करण्यासाठी विशेष कार्यप्रणालीद्वारे यंत्रणा राबवून उद्दिष्ट पार पाडण्याचा मनोदय नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे. 
            
सदर अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मुख्याधिकारी आर्शीया जुही , लेखापाल श्री जगदीश नक्षिणे यांनी  सहकार्य केले. अंदाजपत्रकीय सभेला उपनगराध्यक्ष श्री. सुनील देशपांडे,  विरोधी पक्षनेते श्री. रमेश नळे, सर्व समित्यांचे सभापती, सदस्य नगरसेवक, नगरसेविका व सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.