सकल मुस्लिम समाज तर्फे कॅन्डल मार्च काडून पुलवामा शहिदांना श्रद्धांजली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सकल मुस्लिम समाज तर्फे कॅन्डल मार्च काडून पुलवामा शहिदांना श्रद्धांजली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (शोएब शेख - राजुरा)
सकल मुस्लिम समाज तर्फे कॅन्डल मार्च काडून पुलवामा शहिदांना भाव पूर्ण श्रद्धांजली व तीव्र निषेध करण्यात आला.

जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीएफ च्या जवानांवर दहशदवाधांनी केलेल्या भ्याड हल्ल्या प्रकरणी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकल मुस्लिम समाज व राजुरा वासियांनी संताप व्यक्त केले. व पुलवामा येथे धारातीर्थ पडलेल्या सीआरपीफ च्या ४० शाहिद सैनिकांना श्रद्धांजली देण्याकरिता  मुस्लिम समाज व खोजा समाज व इतर राजुरावासी सहभाग घेतला.

आझाद चौक येथून ठीक ६:३०  वाजता कँडल मार्च काढण्यात आला. या प्रसंगी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून भ्याड हल्ल्याचा जाहीर नेशरद करण्यात आला. रॅली आझाद चौक ते नेहरू चौक ते पंच्यात समिती कडे समाप्त करण्यात आली. रॅलीत पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय सेने अमर रहे, हिंदुस्थान जिंदाबाद चे नारे लावत पंच्यात समिती वर रॅली समाप्त करण्यात आली.

 या प्रसंगी राजुरा मुस्लिम समाज व खोजा समाज व इतर राजुरा वासियांनी जास्तीत जास्त संक्येने सहभाग घेतला व शहीद भारतीय सैनिकांना अभिवादन केला.सकल मुस्लिम समाज तर्फे कॅन्डल मार्च काडून पुलवामा शहिदांना भाव पूर्ण श्रद्धांजली व तीव्र निषेद करण्यात आले. 
              
या प्रसंगी या रॅलीत सय्यद जाकीर, सय्यद साबीर, निशाद बेग,मतीन कुरेशी, सुखावत अली ,शहनवाज कुरेशी, आसीफ सय्यद, असद कुरेशी, सय्यद शौकत,डॉ. इर्षाद शेख, अब्दुल शोएब शेख,शेख साबीर, इम्रान पठाण, अतिक शेख, रशीद शेख, व  इतर सर्व  मुस्लिम समाज व खोजा समाज व  राजुरा वासियांनी जास्तीत जास्त संखेने  सहभाग घेतला व शहीद भारतीय सैनिकांना अभिवादन केला.