नकोसे ग्रुप टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नकोसे ग्रुप टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर

Share This

खबरकट्टा/ तंत्रज्ञान :

इच्छेविरोधात एखाद्या नव्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले गेल्याने होणाऱ्या मनस्तापापासून लवकरच सुटका होणार आहे. व्हॉट्सअॅपने देऊ केलेल्या एका नव्या फीचरमुळे अनाहूतपणे ग्रुप सदस्य होण्याची डोकेदुखी थांबणार आहे. या नव्या वैशिष्ट्यानुसार एखाद्या नव्या ग्रुपमध्ये आपल्याला कोणी समाविष्ट करावे, याबाबतचे अधिकार व्हॉट्सअॅपने थेट यूजरला दिले आहेत.

यानुसार प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन नोबडी, माय कॉण्टॅक्टस अथवा एव्हरीवन या पर्यायांपैकी एका पर्यायाची यूजरला निवड करता येईल. आपल्या संमतीशिवाय कोणत्याही ग्रुपशी जोडले जाण्यास इच्छुक नसणाऱ्या यूजरनी यातील नोबडी या पर्यायावर क्लिक केल्यास संभाव्य डोकेदुखीपासून सुटका होऊ शकेल.




हे वैशिष्ट्य लवकरच व्हॉट्सअॅप बिटाटावर दाखल होणार असून त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये ते उपलब्ध केले जाईल.