जनता महाविद्यालय चौकात रस्ता ओलांडताना एकास भरधाव वाहनाने चिरडले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जनता महाविद्यालय चौकात रस्ता ओलांडताना एकास भरधाव वाहनाने चिरडले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर नागपूर रोड वर जनता महाविद्यालय चौकात भरधाव येणाऱ्या ट्रक ने एकास चिरडले.ही धडक इतकी जबरदस्त होती की सदर इसमाचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी वाहन चालकास अटक केली असून वृत्त लिहेपर्यंत व्यक्तीची ओळख पटली नव्हती.प्राथमिक पाहणीवरू नव्यक्ती पेहरावावरून भिकारी असावा असा अंदाज आहे. पोलिसांनी मृत शरीर शवविच्छेदनासाठी पाठविले असून अधिक तपास करत आहेत.

कोतपल्लीवार पेट्रोल पंप ते जनता महाविद्यालय परिसर दिवसभर अत्यंत गजबजलेला राहत असून चौकातील सिग्नल वर अनेक वेळा परिवहन पोलीस कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष असते. रस्ता ओलांडताना सदर घटना घडल्याने अनेक नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.कालच पोलीस मुख्यालयी  रस्ते सुरक्षा सप्ताहाचे थाटामाटात उदघाट्न झाले व आजच ही घटना घडल्याने रस्ता नियम जनजागृकतेची किती गरज आहे याची जाणीव होते.