खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा):
बार अधिवक्ता संघ राजुरा चे अध्यक्ष अरुण धोटे व गजाननराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात, सचिव राजेंद्र जेणेकर यांच्या नेतृत्वात न्यायालय परिसर ते तहसील कार्यालय पर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली या प्रसंगी मुरलीधर देवाळकर, निनाद येरणे, रमेश लांजेकर,चंद्रशेखर चांदेकर, प्रवीण आस्वले, विजय पुणेकर मंगेश बोबाटे, रामदास सुर, यशवंत खोके, सी जे वाघमारे, राकेश पिंपळकर, वासुदेव बोबाटे, बंडू डांगे, राजू धामोरीकर, देवा झाडे, गणेश सोनुले सहित अधिवक्ता कारकून संघ राजुरा चे सर्व सदस्य उपस्थित होते.
सास्ती कोळसा खाणीत शहीद जवानांना श्रध्दांजली
काश्मीर खो-यातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सिआरपीएफ च्या जवांनावर हल्ला केल्याने सुमारे ४४ जवान शहीद झाले. या शहीद जवानांना बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपनकास्ट कोळसा खाणीतील कामगारांनी द्वारसभा घेऊन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
काश्मीर येथील जवानांवर भ्याड हल्ला करणा-या दहशतवाद्यांचा आणि त्याला चिथावणी देणा-या पाकीस्तानचा तीव्र निषेध यावेळी खाण व्यवस्थापक व कामगार नेत्यांनी आपल्या भाषणात नोंदविला. देशासाठी सर्वोच्च बलीदान करणा-या जवानांच्या कुटूंबियांच्या दुखात सर्व वेकोलि परिवार सामील असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यानंतर दोन मिनीट मौन पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली.
या श्रध्दांजली सभेत खाण व्यवस्थापक व्ही. दयाकर,रघुवीर कोलीशेट्टी, लक्ष्मण महंतो,साकेत बनकर, अभियंता नविनकुमार बंदीला, अभिनव गर्ग, दत्तात्रय देशमुख,नविन जैन, कामगार नेते सुधीर घुरडे,दिलीप कनकुलवार,रवि डाहूले,अशोक चिवंडे,शांताराम वांढरे, विजय कानकाटे,पुरुषोत्तम कोसुरकर, विवेक अल्लेवार,बंडू मेश्राम, भास्कर कायरकर, मधुकर विधाते, हुसेन खान,उल्हास खुणे, सुर्यभान धारणे,अब्दुल रफिक, सातुर तिरुपती,गजानन बोबडे, पांडुरंग नंदूरकर, संजय खरतड,अरुण नैताम,मार्कंडी उरकुडे, दादाजी राजुरकरइत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.