लोकशाहीत जनतेची भुमिका सर्वश्रेष्ठ असावी:नगराध्यक्ष अरुण धोटे. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लोकशाहीत जनतेची भुमिका सर्वश्रेष्ठ असावी:नगराध्यक्ष अरुण धोटे.

Share This
-राजुरा येथे रामचंद्रराव धोटे महाविद्यालयत देशाच्या विकासासाठी भारतीय लोकशाही विषयावर चर्चासत्र संपन्न. 

खबरकट्टा /चंद्रपूर :(दीपक शर्मा :राजुरा)
रामचंद्रराव धोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ : २० वाजता राज्यशास्त्र अभ्यास मंडळ आणि लोकशाही क्लबच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या विकासासाठी भारतीय लोकशाही विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे हे होते. उद्घाटक तथा अतिथी व्याख्याते म्हणून शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूरचे प्रा. डॉ. संजय गोरे आणि अतिथी व्याख्याते म्हणून शिवाजी महाविध्यालय राजुराचे प्रा. डॉ. राजेन्द्र मुद्दमवार होते तर प्रमुख अतिथी रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. समिर पठाण, निश्चल इटणकर, प्रा. सत्यपाल उरकुडे, प्रा. यश्वीनी घोटेकर, प्रा. मधुकर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी समृद्ध आणि विकासाभिमुख लोकशाहीसाठी वास्तविक विकासाचा आग्रह लोकशाहीच्या चारही आधार स्थंभाकडे धरणारी जनता ही लोकशाहीचा कणा आहे. लोकशाहीत जनतेची भुमिका सर्वश्रेष्ठ असावी असे मत व्यक्त केले.

उद्घाटक म्हणून बोलताना प्रा. डॉ. संजय गोरे यांनी लोकशाहीची नैतिक मुल्य टिकविणे ही तरूणांचे नैतिक कर्तव्य आहे. महापुरुषांच्या अपरिमित त्यागातून भारतीय लोकशाही उभी राहिली आहे. राज्यघटनेने दर्जेदार लोकशाही व्यवस्था देशाला दिली आहे ती टिकवून ठेवणे आपण सर्वांचे दायित्व आहे असे मत व्यक्त केले. तर प्रा. डॉ. राजेन्द्र मुद्दमवार यांनी लोकशाही यशस्वी होण्यासाठी लोकशाहीच्या चारही आधारस्तंभांनी व आपण नागरिकांनी निष्पक्षपणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवानंद चुनारकर यांनी केले. संचालन साक्षी लभाणे हिने तर आभारप्रदर्शन प्राचार्य प्रफुल्ल शेंडे यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल प्रविण बुक्कावार, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह विद्यार्थ्यांनी अनमोल सहकार्य केले.