राजुरा वासियांनी कँडल मार्च काढून पुलवामा शहिदांना अर्पण केली भावपुर्ण श्रद्धांजली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा वासियांनी कँडल मार्च काढून पुलवामा शहिदांना अर्पण केली भावपुर्ण श्रद्धांजली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :(शोएब शेख /राजुरा ):


आज 15 फेब्रुवारी 2019 रोजी समस्त राजुरा जनतेच्या व सर्व राजकीय पक्षाचा वतीने काश्मीर येथील पुलवामा येथे धारातीर्थी पडलेल्या सीआरपीएफ च्या 40 शहिद सैनिकांना अभिवादन करण्या करिता शहरातील आंबेडकर चौक येथून सायंकाळी 6:30वाजता  कँडल मार्च काढण्यात आला.या प्रसंगी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून भ्याड हल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे,सुनील देशपांडे ,अरुण मस्की, कुंदा जेणेकर, नितीन पिपरे ,अमेय धोटे  एजाज अहमद ,हरजीत सिंग, असिफ सय्यद, गजेंद्र भटारकार  सहित शहरातील अनेक नागरिक भावविभोर मनाने एकवटले होते.