नवेगाव,हिरापूर,गणेरी,कारगाव या गावांना तालुकानिहाय ग्रामपंचायतींना जोडा :अँड. वामनराव चटप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नवेगाव,हिरापूर,गणेरी,कारगाव या गावांना तालुकानिहाय ग्रामपंचायतींना जोडा :अँड. वामनराव चटप

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके:राजुरा-कोरपना)

चंद्रपूर जिल्हयातील राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील चार ग्रामपंचायती प्रशासकिय सोय आणि गावक-यांच्या सुविधेसाठी संलग्न तालुक्यातील गावांना जोडण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे केली आहे.


गेल्या अनेक वर्षापासुन या चार गावांना मोठ्या अडचणीचा  सामना करावा लागत आहे. अँड. चटप यांच्या प्रयत्नाने या गावांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असुन वरिष्ठ पातळीवर या मागणीची दखल घेण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे  उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात संवर्ग विकास अधिका-यांना पत्र लिहून याविषयी अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

🔷राजुरा तालुक्यातील वरोडा ग्रामपंचायतीला जोडलेले कोरपना तालुक्यातील नवेगाव हे गाव कोरपना तालुक्यातील बाखर्डी या ग्रामपंचायतला जोडण्यात यावे. 
🔷कोरपना तालुक्यातील निमनी या गटग्रामपंचायतीत असणारे हिरापूर हे राजुरा तालुक्यातील गाव याच तालुक्यातील कळमना या तालुक्याला जोडावे. 
🔷राजुरा तालुक्यातील कावडगोंदी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेले गणेरी हे गाव जिवती तालुक्यातील आहे. म्हणून गणेरी हे गाव जिवती तालुक्यातील पुनागुडा ग्रामपंचायतीला जोडण्यात यावे. 
🔷जिवती तालुक्यातील धनकदेवी या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेले  कोरपना तालुक्यातील कारगाव (बुजरुक ) हे गाव याच तालुक्यातील धानोली ग्रामपंचायतीला जोडण्यात यावे. 

अशा चार गावांच्या ग्रामपंचायती विभाजित करुन संलग्न तालुक्यातील ग्रामपंचायतींना जोडण्याची मागणी माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचेकडे केली होती.

अँड. वामनराव चटप यांच्या न्याय्य  मागणीची सकारात्मक दखल शासकिय पातळीवरुन घेण्यात आली असुन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी राज्य शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या ग्रामपंचायत विभाजन व एकत्रिकरण शासन निर्णय दिनांक १२ फेब्रुवारी २००४ मधील तरतुदींचा आधार घेत हिरापूर हे गाव राजुरा तालुक्यातील कळमना या गावाला जोडण्याचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश राजुरा व कोरपना पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिका-यांना दिले आहेत.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील नवेगाव, हिरापूर, गणेरी, कारगाव (बुज.) ही चार गावे नविन तालुका निर्मितानंतर भौगोलिक स्थितीनुसार मुळ तालुक्यातून वगळून शेजारच्या तालुक्यातील ग्रामपंचायतींना जोडण्यात आले. यामुळे प्रशासकिय पातळीवर बराच गोंधळ तर होत आहेच शिवाय गावक-यांना प्रमाणपत्र, शासकिय योजनांसाठी कागदपत्रांची पुर्तता करणे कठीण व अत्यंत त्रासाचे काम झाले आहे. या सर्व गावांना विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने गावांचा विकास खोळंबला आहे. अँड. चटप यांच्या पुढाकाराने आता या गावांना न्याय मिळत असल्याने गावक-यांनी अँड. वामनराव चटप यांचे अाभार मानले आहे.