चिमूर नगरपरिषदेला अग्निशमन केंद्र व वाहनास शासनाची प्रशासकीय मान्यता:चिमूर परिसरातील आगीवर वेळीच मिळवता येणार नियंत्रण - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर नगरपरिषदेला अग्निशमन केंद्र व वाहनास शासनाची प्रशासकीय मान्यता:चिमूर परिसरातील आगीवर वेळीच मिळवता येणार नियंत्रण

Share This
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे प्रयत्नांला यश शासनाचा ८०टक्के निधी ६४ लाखाचा निधी मंजूर

खबरकट्टा / चंद्रपूर(अरविंद राऊत-चिमूर):

चिमूर नगरपरिषद निर्मिती नंतर सर्वात आवश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणा केंद्र करीता नगरपरिषद चिमूर  प्रस्ताव सादर करून चिमूर विधानसभा क्षेत्रांचे युवा तडफदार आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे मागे लागून सतत पाठपुरावा करून अखेर अग्निशमन आपत्कालिन सेवाांचे बळकटीकरण  करण्यासाठी  महाराष्ट्र अग्निसुरक्षा  अभियान  योजनेंअंतर्गत चिमूर (जि.चंद्रपूर)  नगरपरीषदला ६४लाखाचा   निधी   

मंजूर करीत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने लवकरच चिमूर येथे अग्निशमन केंद्र व वाहन उपलब्ध होणार असल्याने चिमूर नगरवासी जनतेत आनंद व्यक्त केल्या जात आहे .

चिमूर विधानसभा क्षेत्रांचे तडफदार युवा आमदार यांच्या संकल्पनेतून प्रयत्नांनी ३०मे २१५ ला साडेचार वर्षांपूर्वी चिमूर  नगरपरिषदेची निर्मिती करण्यात आली होती अनेकदा आगीच्या घटना घडत असतात विशेषतः उन्हाळ्यात घरांना,गोठ्याना ,दुकानाला आगीच्या घटना होऊन मोठी वित्त व वेळप्रसंगी जीवित व प्राणी आणि होत असते अशावेळी अग्निशमन यंत्रणा नसल्याने चिमूर व परिसरातील जनतेला मोठी नुकसानीला सामोरे जावे लागत होते.

तेव्हा चिमूर नगरपरिषद ला अग्निशमन यंत्रणा करिता प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दिल्या या सूचनांचे पालन करीत चिमूर नगरपरिषद निर्मिती नंतर सर्वात आवश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणा केंद्र करीता नगरपरिषद चिमूरने प्रस्ताव सादर करून चिमूर विधानसभा क्षेत्रांचे युवा तडफदार आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे मागे लागून सतत पाठपुरावा करून अखेर अग्निशमन आपत्कालिन सेवाांचे बळकटीकरण  करण्यासाठी  महाराष्ट्र अग्निसुरक्षा  अभियान  योजनेंअंतर्गत चिमूर (जि.चंद्रपूर)  नगरपरीषदला ६४लाखाचा   निधी   
मंजूर करीत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने लवकरच चिमूर  येथे अग्निशमन केंद्र व वाहन उपलब्ध होणार असल्याने चिमूर  नगरवासी जनतेत आनंद व्यक्त केल्या जात आहे .
   
अग्निशमन केंद्र बांधकाम व अग्निशमन दलाचे वाहन यंत्रणा यासाठी ८०लाखाचा खर्च अपेक्षित असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले असून ८०टक्के शासनाचा हिस्सा मंजूर करीत ६४ लाखाचे  निधी मंजूर करून दिल्याबद्दल ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ,वित्त मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व चिमूर विधानसभा क्षेत्रांचे तडफदार आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे माजी नगराध्यक्ष शिल्पा राचलवर , सभापती सतीश जाधव ,सभापती नितीन कटारे , भारती गोडे नगरसेविका ,छाया कँचलवर , उषा हिवरकर , ननावरे , संजय खाटीक नगरसेवक यांनी नगरपरिषद ला अग्निशमन यंत्रणा मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले .