पुलवामा आतंकी हमल्यातील शाहिद जवानांना कवियत्री मेघा धोटे यांची संवेदना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुलवामा आतंकी हमल्यातील शाहिद जवानांना कवियत्री मेघा धोटे यांची संवेदना

Share This
खबरकट्टा / विशेष :

काश्मीर येथील पुलवामा आतंकवादी हमल्यात शाहिद झालेल्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना खबरकट्टा टीम विनम्र श्रद्धांजली अर्पण करून  कवियत्री मेघा धोटे यांच्या शब्दात आपल्या जवानांच्या प्रति संवेदनशीलता व्यक्त करत आहे. 

असे कसे भाऊ तुमचं
 खवळत नाही रक्त।
हकनाक शूर  मेले
तरी तुम्ही  अजून गप्प।।

नुसती श्रद्धांजली वाहून
नाही संपनार विषय।
नका म्हणू निवडणूक तोंडावर
हा ब्रेकिंग इंडिया चा विषय ।।

गेला कुणाचा भाऊ,
कुणाचा  नवरा,कुणाचा मुलगा,
अजून किती वाट बघायाचि
कधी काढणार कायमचा तोडगा?

येता जाता कुणीही असं 
टिचकी मारून कसे जाते,?
वरवरची मलमपट्टी नको, कारण
ज्याचं जळते त्यालाच कळते।

असे कसे भाऊ तुमचं
 खवळत नाही रक्त।
हकनाक शूर  मेले
तरी तुम्ही  अजून गप्प।।

मेघा  धोटे राजुरा
11.00pm
14 Feb,2019