रामपूर जि. प. शाळेचे शिष्टमंडळाद्वारे औचक निरीक्षण: शाळेला अध्ययावत सुविधा पुरविण्याची मागणी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रामपूर जि. प. शाळेचे शिष्टमंडळाद्वारे औचक निरीक्षण: शाळेला अध्ययावत सुविधा पुरविण्याची मागणी.

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (चेतन खोके :राजुरा )
राजुरा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वर्तमान स्थितीची पाहणी करण्यासाठी जि. प. सदस्य डॉ. नामदेव करमनकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रामपूर येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने शाळेला भेट दिली.


      
 या प्रसंगी शिष्टमंडळात रामपूर च्या सरपंच वंदनाताई गौरकार, उपसरपंच हेमलता ताकसांडे, ग्रा. प. सदस्य जगदीश बुटले, यासह स्थानिक नागरिक रतन गर्गेलवार, कोमल फुसाटे, दिलीप लांडे, गेडाम, रोहित नांदे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
         
या प्रसंगी शिष्टमंडळाने शाळेचे औचक निरीक्षण केले, पाहणी केली तेव्हा शाळेची स्थिती अतिशय दयनीय आढळून आली, शाळेत अपुऱ्या भौतिक सुविधा आढळून आल्या, शाळेचे फ्लोरींग उखडले आहे, शाळेच्या इमारतीचे छत गळती तसेच भिंतीला ओलावा येणे अशा अनेक समस्या आढळून आल्या. शिवाय शाळा अतिशय जिर्न अवस्थेत असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते असे आढळून आले. या सर्व समस्यांची लवकरात लवकर उकल करून शाळा उत्तम दर्जाची करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. ग्रामपंचायत तसेच जि. प. सदस्य यांच्या वतीने जिल्हा परिषदेकडे यासाठी पाठपुरावा करण्यात यावा असे शिष्टमंडळाद्वारे ठरविण्यात आले.