चिमूर येथे शेतकरी आत्महत्या : जिल्ह्यात आठवाड्यातील दुसरी घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर येथे शेतकरी आत्महत्या : जिल्ह्यात आठवाड्यातील दुसरी घटना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चिमूर ):
चिमूर तालुक्यातील आमडी येथील मधुकर सूर्यवंशी (62)या शेतकऱ्यांने बुधवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. 

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते. मागील दोन वर्षांपासून नापिकी मुळे ते कर्ज फेडण्यास असमर्थ होते. 

दरम्यान दुपारी त्यांनी विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली. सदर बाब कुटुंबियांना लक्ष्यात येताच त्यांना तात्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे नागपूर ला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ठेवण्यात आला होता.