छत्रपती शिवाजी महाराज शेतकरीप्रिय राजे- दीपक चटप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरीप्रिय राजे- दीपक चटप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
कवठाळा ग्रामवासियांच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना विधि अभ्यासक दीपक चटप म्हणाले की, शिवरायांच्या प्रतिमेचा वापर हिंदू मुसलमान तेढ निर्माण करण्यासाठी केला जातो. 


म्हणून हे सांगितले पाहिजे कि, शिवरायांच्या २१ अंगरक्षकांपैकी १३ अंगरक्षक मुसलमान होते. शिवरायांचा तोफखान प्रमुख, आरमार प्रमुख, सरनौबत हे सारे मुसलमान होते. ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला, ती वाघनखे देखील एका मुसलमानाने तयार केली होती. इतकचं काय तर शिवरायांचा वकील देखील मुसलमान होता.

जे लोक शिवरायांचा वापर करून भांडणे लावतात त्यांना सांगितले पाहिजे की, “सभी का खून शामिल है, यहा कि मिठ्ठी में.. किसीके बाप का हिंदोस्ता थोडी है...” छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातीचे, सर्व धर्माचे राजे होते. त्यांनी हिंदू राज्य, मुसलमान राज्य अशे स्वप्न बघितले नाही. तर, रयतेचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. 

पुढे ते म्हणाले की, शिवरायांच्या राज्यात शेतकऱ्यांवर कधीही मोर्चा काढण्याची वेळ आली नाही आणि शिवाजी राजे यांच्या हुकुमांचा अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात येईल की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरीप्रिय राजे होते. 

शिवजयंती कार्यक्रमाचे प्रस्ताविक संभाजी ब्रिगेडचे शंकर बोढे यांनी केले तर उद्घाटन सरपंच नरेश सातपुते यांनी केले. शिवरायांचे विचार डोक्यात ठेवल्यास विकास होईल, अशे प्रतिपादन सरपंच सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र ठाकरे, देवेंद्र हेपट, कोहळे, कोडपे आदींनी सहकार्य केले.यावेळी तरुणांची मोठी उपस्थिती होती.