पत्रकार पेन्शन योजनेसाठी अधिवेशनात भरीव तरतूद करणार:अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पत्रकार पेन्शन योजनेसाठी अधिवेशनात भरीव तरतूद करणार:अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार

Share This
-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन

खबरकट्टा /मुंबई  प्रतिनिधी:

अधिस्वीकृती पत्रकार बरोबरच जास्तीत जास्त पत्रकार यांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी या अधिवेशनात भरीव तरतूद करणार असे मत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने मंत्रालयात ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार पेन्शन योजना पत्रकार यांचेसाठी लागू केले बद्दल आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, मंत्रालय वार्ताहर संघटना सदस्य खंडूराज गायकवाड, वृत्तवाहिनी प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, संस्कृती विभाग प्रमुख संदीप भाटेवर, वृत्तवाहिनी संघाचे मुंबई अध्यक्ष संदीप माळवदे, विभागीय अध्यक्ष स्वामी शिरकुल, वृत्तवाहिनी संपर्क प्रमुख उमेश कुलकर्णी, ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे, नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, अकोले तालुकाध्यक्ष अशोक उगले, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर करडे, सरचिटणीस नरेश पाटील आदी उपस्थित होते.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो मानाने जगला पाहिजे. त्यासाठी त्यांना पेन्शन योजना लागू केली असून दहा कोटींची रुपयेची मागणी या पत्रकार संघाने केलेली असताना पंधरा कोटी मंजूर केले आहे. मात्र ही तरतूद पुरेशी नसून खरे गरजवंत पत्रकार उपेक्षित आहे. त्यांना शहरी ग्रामीण भेद न करता सर्वांना कशी लागू करता येईल. यादृष्टीने पत्रकार संघाने मागणी केलेले दोनशे कोटी रुपयेचा आराखडा तयार करून या अर्थसंकल्पात मंजूर करता येईल असे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.तसेच सर्व पत्रकार यांचा समावेश महात्मा फुले जनारोग्य योजनेत समावेश करण्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे.

समाजातील प्रश्‍न निरपेक्ष भावनेने पत्रकार मांडत त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारने घेतली असून पत्रकार हल्ला विधेयक, पेन्शन योजना, आरोग्य योजना असे निर्णय घेतले त्यात महत्वपूर्ण भूमिका राज्याचे अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी बजावली आहे. असे मत राज्याचे संघटक संजय भोकरे यांनी व्यक्त केले.