चंद्रपुर जिल्हा युवक काँग्रेस च्या जिल्हा सचिव पदी असिफ सय्यद यांची नियुक्ती. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुर जिल्हा युवक काँग्रेस च्या जिल्हा सचिव पदी असिफ सय्यद यांची नियुक्ती.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : (चेतन खोके /राजुरा ):
चंद्रपुर जिल्हा युवक काँग्रेस च्या जिल्हा सचिव पदी राजुरा येथील काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ते आसिफ सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली.
काँग्रेस  जिल्हा  अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या  नेतृत्ववात आणि माहितीवरून आज चंद्रपूर जिल्ह्याचे युवक कांग्रेस अध्यक्ष हरीश कोत्तावार यांनी त्यांची निवड  केली. याबद्दल राजुरा तालुक्यातील  युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातवरण असून सुभाष भाऊ धोटे यांच्या नेतृत्वात व पक्षाला अधिक बळकटी देण्याकरिता प्रत्नशील राहु अशी प्रतिक्रिया प्रतिनिधींशी बोलताना असिफ सय्यद यांनी दिली.
त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हा युवक कांग्रेस अध्यक्ष हरीश कोत्तावार, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे,शहर अध्यक्ष संतोष गटलेवार, युवक कांग्रेस शहर अध्यक्ष अशोक राव यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीचा आनंद व्यक्त केला आहे.