सास्ती येथे कॉग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सास्ती येथे कॉग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश

Share This
पक्षाच्या ध्येयधोरणाचा व योजनेचा प्रचार व प्रसार करा :आमदार अँड संजय धोटे
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा):
भारतीय जनता पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्रातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी समर्पण दिन तसेच कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज संकुलन येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड संजय धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा हे उपस्थित होते.
आगामी १२ फरवरी २०१९ पासून ते ६ मार्च २०१९ पर्यत पक्षातर्फे देण्यात आलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी सांगण्यात आले.
पक्ष हिताचे काम,आगामी निवडणुकीत तसेच पक्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे याकरिता यावेळी सांगण्यात आले.

राजुरा तालुक्यातील सास्ती येथील कॉग्रेसचे ग्रामपंचायत सदस्या सौ नंदा चेतुलवार व सुशीला आत्राम यांनी आमदार अँड संजय धोटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

आमदार अँड संजय धोटे यांनी बोलताना आगामी काळात पक्षाचे ध्येयधोरणाचा व सरकारच्या योजनेचा प्रसार व प्रचार करण्याचा तसेच मेरा परिवार भाजपा परिवार हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले राज्य व केंद्र सरकारच्या योजना जनतेच्या घराघरा पर्यत पोहचविण्याची जबाबदारी ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे,आपण केलेले विकास कामे भरपूर असून त्याचा प्रसार खूप कमी होत असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी जिवती भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी,गोंडपीपरी तालुका अध्यक्ष बबन निकोडे,राजुरा विस्तराक सतीश दांडगे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे,सुरेश केंद्रे,संजय मुसळे,रमेश मालेकर,वाघुजी गेडाम,उपसभापती मनीष वासमवार,पंचायत समिती सदस्य नूतन जीवने,भाऊराव चंदनखेडे,बंडू बोनगीरवार,महादेव तपासे,दत्ता राठोड,सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,राजकुमार भोगा,पंचायत समिती सदस्य सौ सुनंदा डोंगे,भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष स्वाती देशपांडे, कु नैना परचाके सुरेखा बोरकुटे, भावना पंचमथिया उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन रवि बुरडकर यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.