चिमुर तालुक्यात रमाई आवास योजनेंतर्गत ८०० पेक्षा जास्त घरकूल मंजूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमुर तालुक्यात रमाई आवास योजनेंतर्गत ८०० पेक्षा जास्त घरकूल मंजूर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चिमूर-अरविंद राऊत)

चिमूर तालुक्यात रमाई आवास योजनेअंतर्गत ८०० पेक्षा जास्त घरकुल मंजूर झाली असून याचा लाभ अनुसूचित जातीच्या पात्र  लाभार्थ्यांना मिळणार आहे.
                              
महाराष्ट्र शासन  मागील ४ वर्षापासुन अनुसूचित जातीच्या विकासासाठी प्रयत्नशील असुन यांना पक्के घर प्राप्त व्हावे यासाठी समाजकल्याण विभागामार्फत राज्यात रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल देण्यात येत आहे अलिकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी विशेष प्रयत्न करुन चंद्रपूर जिल्ह्यासाठी ५००० ने घरकुलाचा कोटा वाढवून हा कोटा आणखी २५०० घरकूल ने वाढविण्यात त्यांना यश आले असुन चंद्रपूर  जिल्ह्य़ाला आता ग्रामीण भागात ७५०० रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थी असणार आहेत.

याचा लाभ चिमुरतालुक्यातील अनेक लाभार्थीना होणार आहे आता चिमुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ८०० पेक्षा जास्त लाभार्थी या  मध्ये पात्र ठरणार आहे.  प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात चिमुर पंचायत समितीला रमाई आवास योजनेंतर्गत एवढा मोठा लाभ मिळण्याची ही पहीलीच वेळ आहे अशी माहिती चिमुर पंचायत समिती सदस्य प्रदीप कामडी यांनी दिली व हे मिळवुन दिल्याबद्दल समाजकल्याण मंत्री नामदार राजकुमारजी बढोले,ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे व चंद्रपूर जिल्ह्याला जास्तीत जास्त घरकुल मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारव चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे आभार व्यक्त केले