श्रमिक एल्गारची ब्रम्हपुरी तालुका कमेटी गठीत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्रमिक एल्गारची ब्रम्हपुरी तालुका कमेटी गठीत

Share This
खबरकट्टा / दिपक शर्मा :चंद्रपूर 
श्रमिक एल्गार च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्याची श्रमिक एल्गार तालुका कार्यकारीणी जवराबोडी मेंढा येथिल शिव मंदीराच्या परीसरात श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे उपस्थितीत गठीत  करण्यात आली.

 तालुक्यात वाढते वाघाचे हल्ले , वनजमिनीचे पट्टे, निराधारांच्या पगारात वाढ, वन्यप्राण्यापासुन होत असलेल्या पिकाची नुकसान भरपाई, बांबु कारागीरांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनेची गरज असुन संघटना वाढविण्याच्या दृष्टीने  ही तालुका कमेटी गठीत करण्यात आली.  

यावेळी अॅड. गोस्वामी यांनी सर्व पादाधिकाऱ्याना शुभेच्छ्या देवुन संघटनेचे काम जिद्दीने करण्याचे आव्हान केले. 

 तालुका अध्यक्ष म्हणुन मोतीराम विधाते, उपाध्यक्ष सौ. मंगला आवारी, मारोती नागोसे, तालुका सचिव गीरीधर नाकतोडे सहसचिव घनशाम लेंझे प्रमुख कार्यकर्ता म्हणुन बाळकृष्ण दुमाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या सभेला श्रमिक एल्गारचे महासचिव व श्रमिक एल्गारचे सदस्य उपस्थित होते.