वनहक्क कायद्याच्या शासन आदेशाची पायमल्ली : पिडीताने दिला आत्मदहनाचा इशारा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वनहक्क कायद्याच्या शासन आदेशाची पायमल्ली : पिडीताने दिला आत्मदहनाचा इशारा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी - वरोरा):

पिडीत शेतकऱ्याची गेली 90 वर्षांपासून वन जमिनीवर वहिवाट सुरू आहे आणि शासनाचा वनहक्क समितीचा सदर जमिन नावे करण्यासाठी आदेश झाला आहे.  शासन कार्यालयाचा उंबरठा ओलांडता ओलांडता सहा वर्षे निघून गेले तरी अजूनही ताबा असतांना जमीन नावाने झाली नसल्याने अखेर सदर शेतऱ्यांनी  जिल्हाधिकारी यांना आत्महत्या  करण्याचा ईशारा निवेदनातुन देण्यात आले असल्याची माहिती आहे.


तालुक्यातील माढेळी जवळील वडगाव येथील रहिवासी असलेले श्रावण अजाब मडावी यांचा पूर्वज  वारसाणाने सुमारे 90 वर्ष पासून वनविभागाच्या जमिनीवर ताबा आहे,व 1970 साली सादर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे. साझा क्रमांक 5 मधील  मौजा वडगाव  येथील भूमापन क्रमांक 54  मध्ये। 1 हेक्टर 87 आर ह्या जमिनीवर आदिवासी जातीतील असलेला शेतकरी वाहीती करीत आहे.
जिल्हाधिकारी यांना अखेर न्याय मिळाला नाही तर आत्महत्याची मागणी पुर्ण न झाल्यास उपविभागीय कार्यालया समोर कुटुंबासह आमरण  उपोषनाला बसणार असून कुटुंबाला जर काही झाले तर शासन जबाबदार राहील-पीडित श्रावण मडावी. 


2012 नाध्ये शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सदर जमिनीची मालकी मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज सुद्धा केला होता तसेच  वनविभागाने मडावी यांच्या विरुद्ध न्यायालयातून  अपील दाखल केली असतांना सुद्धा मडावी यांच्या बाजूने निर्णय दिला.  व त्या निर्णया आधारित  जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना मडावी यांचे नावाने पट्टे देण्यात असा आदेश केला होता परंतु उपविभागीय अधिकारी यांनी वेगवेगळ्या त्रुटी काढून त्याला परत केल्या जात असे त्यानंतर वेगवेळ्या अधिकारी यांचे कडे मडावी गेले  परंतु आल्या पावली त्यांना  परत यावे लागले.

सरकारी अधिकाऱ्याच्या अढेलतट्टू धोरणाने 5 मार्च 2016 रोजी बोर्डा चौक दरम्यान रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परन्तु वेळीच काही जणांच्या लक्षात   येताच आत्महत्या करण्यापासून वाचविले होते.