खबरकट्टा /चंद्रपूर: गडचांदूर :
-आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वतात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या मागणीला यश.
कोरपना तालुक्यातील गडचांदुर येथील बामणी-अदिलाबाद ३५३ (ब)राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्याबाबत मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती.गडचांदुर येथील मुख्य महामार्गावर गतिरोधक बसविण्याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा समिती हंसराजजी अहिर यांनी कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना परवानगी दिली आहे. यासाठी आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी पत्रव्यवहार वअथक पाठपुरवठा केला होता.
गडचांदुर येथून शहराच्या मध्यभागातून हा महामार्ग जात असून सदर रस्त्याचे चौपदरिकरण झाले असून सदर रस्त्यावर दिवसभर वाहतूक सुरु असते तसेच यामार्गावर खूप जास्त प्रमाणात वर्दळ असते.तसेच तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामुळे त्यामुळे त्यांना सुद्धा रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागतो.
गडचांदुर शहरात रेल्वे चौक, माणिकगड चौक,बस स्टॉप चौक,सावित्रीबाई फुले शाळा चौक असे महात्वाचे ४ चौक आहेत.परंतु या एकही चौकात गतिरोधक नसल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे सदर ठिकाणी बसविण्यासाठी गडचांदूर येथील पत्रकार,नागरिक व विद्यार्थी यांनी सदर बाब भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या लक्षात आणून दिली सदर बाबीची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी चंद्रपूर,कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे या संदर्भात मागणी करून वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरवठा केला आशिष ताजने यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सदर विषय जिल्हा रस्ता सुरक्षा समिती समोर ठेवून याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्याअनुषंघाने त्यांनी सदर विषय बैठकीत ठेवला, त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री व अध्यक्ष जिल्हा रस्ता सुरक्षा समिती हंसराजजी अहिर यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना परवानगी दिली.त्यामुळे गडचांदुर येथील मुख्य मार्गावरील प्रमुख चौकात लवकर गतिरोधक बसविण्यात येणार आहे.