बल्लारपूर पोलिसांची कारवाई :११ लाखांचा दारूसाठा जप्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर पोलिसांची कारवाई :११ लाखांचा दारूसाठा जप्त

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (बल्लारपूर):
वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विसापूर येथे सापळा रचून ११ लाख १० हजार रूपयांची देशी दारू व ६० हजार रूपये किमंतीचे वाहन असा एकूण ११ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.


बल्लारपूर पोलीस ठाण्याअंतर्गत विसापूर येथील जुन्या वस्तीच्या गल्लीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा साठवून असून त्याची वाहतूक होणार असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापडा रचून देशी दारूसोबत सुझुकी मोपेट दुचाकी वाहन असा एकूण ११ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. परंतु, कारवाई दरम्यान आरोपी फरार झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल भारती, सहायक पोलीस निरीक्षक संदीप धोबे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, राजेंद्र खनके, मनोज पिदुरकर, जीवन पाल, प्रशांत निमगळे, दिलीप आदे आदींनी केली.