अवकाळी पावसामुळे व वादळामुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवकाळी पावसामुळे व वादळामुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (अरविंद राऊत-चिमूर)

काल दिनांक 15 फेब्रुवारी 2019 ला  झालेल्या अवकाळी पाऊस  वादळामुळे चिमूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील चना,गहू,मिरची या पिकांची खूप मोठी नुकसान झाली अवकाळी पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारीचे प्रमाण पडल्याने गहू, चना,व मिरची पीक खराब झाले असून अचानक आलेल्या या आपत्ती ने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील प्रचंड पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी गारपीट ग्रस्तांकडून होत आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी , तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात गारपीटग्रस्त गावांतील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी होत आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचे चित्र स्पष्ट होणार आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने पळविला. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून केली जात आहे. 
   
बऱ्याच गावातील घरांची टिन पत्रे वादळाने उडाली रस्त्यावर झाळे कोसळली आशा प्रकारे अनेक नुकसान झालेली आहे .