युती उवाच :प्रभू श्रीराम मंदिर हा आमच्यातील धागा आहे : वाचा भाजपा शिवसेना युतीच्या घोषणेतील मुद्दे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युती उवाच :प्रभू श्रीराम मंदिर हा आमच्यातील धागा आहे : वाचा भाजपा शिवसेना युतीच्या घोषणेतील मुद्दे

Share This
खबरकट्टा / मुंबई :

कोकणातील नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता नसल्याचेही त्यांनी जाहीर केले.शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची घोषणा करताना त्यांनी ही भूमिका जाहीर केली. व्यापक आणि राष्ट्रीय हितासाठी युती होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेसाठी निम्म्या-निम्म्या म्हणजे प्रत्येकी 144 जागांवर दोन्ही पक्ष लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोकसभेसाठी भाजप 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढणार आहेत. 

फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

-मुंबईतील नागरिकांना 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात येईल

-नाणार प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल

-तांत्रिक करण किंवा बँकांच्या धोरणामुळे कर्जमाफी पासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांकंग आढावा घेत तत्काळ कर्जमाफी मिळून दिली जाईल

-कृषी विकास केंद्राच्या ठिकाणी पीक विमा संदर्भात तक्रार नोंदवून घेऊन प्रश्न सोडवला जाईल

-राष्ट्रीय विचारांचे पक्ष एकत्र यावे यासाठी आम्ही एकत्र येत आहोत

-लोकसभा, विधानसभा आणि सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची निर्णय घेतला आहे

-सत्ता, पद यासाठी नाही तर वैचारिक भूमिकेसाठी एकत्र येत आहोत

-उद्धव ठाकरे यांनी शेतकरी,सामान्य नागरिकांचे हित ही भूमिका पुढे करत एकत्र येत आहोत

-श्रीरामाचे मंदिर उभे राहिले पाहिजे यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहे

-केंद्र सरकरने 63 एकर जमीन न्यासाला देत मंदिर उभारणीला मार्ग सुकर केला आहे

-प्रभू श्रीराम मंदिर हा आमच्यातील धागा आहे

-शेतकऱ्यांच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे यांनी आग्रह ठेवला आहे

-शेतकरी काही तांत्रिक कारणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिल