एसटी व मोटारसायकल चा भीषण अपघात: माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम धावले मदतीला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एसटी व मोटारसायकल चा भीषण अपघात: माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम धावले मदतीला

Share This
खबरकट्टा /गडचिरोली (सेवा वाकाडोतपवार-अहेरी):
          

अहेरी तालुका मुख्यालया पासून पाच कीलोमीटर अंतरावर असलेल्या नागेपल्ली  येथे अग्रवाल हाॅटेल जवळील वळणावर एसटी बस व मोटारसायकल चा भीषण अपघात झाला. 


        
सविस्तर वृत असे की,अहेरी आगाराची सिरोंचा ला जाणारी बस आज 25 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी 9 वाजता  बस चालक सुनिल दुग्गा हे चालवत जात असताना नागेपल्ली येथील एका वळणावर समोरुन येत असलेल्या एका हीरो होंडा मोटारसायकल स्वार सी 60 चा जवान सुरज बंन्सी याला समोरुन जोरदार धडक दिल्याने जवान गंभीर जखमी झाला.
  
याच सुमारास माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम  हे एटापल्ली येथे जाण्याकरीता निघाले असता त्याना हा अपघात दिसला.ते लगेच गाडीवरून खाली उतरून मदतीला धावले. आणि स्वतःच्या वाहनाने जखमी जवानाला  अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहचविले. डाॅक्टर हकीम यानी प्राथमिक उपचार करुन त्याला चंद्रपूर येथे 108 ची व्यवस्था करुन हलविले.जखमी जवानाच्या उजव्या पायला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी जवानाचे नशिब बलवान म्हणून तो या अपघातुन वाचला अशी प्रत्यक्ष दर्शि लोकांची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.आता ह्या जवानाची प्रकृती धोक्या बाहेर आहे. तर माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या मदतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.