बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती करण्याची संधी -- आमदार अँड संजय धोटे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती करण्याची संधी -- आमदार अँड संजय धोटे

Share This
-नोकारी खु येथे हळदी कुंकू मकरसंक्रांत स्नेहमिलन सोहळा संपन्न.

खबरकट्टा / चंद्रपूर:(दिपक शर्मा :राजुरा ):

महिलांना कोणताही रोजगार उपलब्ध करण्याचे असल्यास त्याकरिता महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होई शकतो, त्या करिता महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार अँड संजय धोटे यांनी केले.


राजुरा तालुक्यातील नोकारी खु.येथे भाजपा महिला आघाडी तर्फे आयोजित हळदी कुंकू स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी आमदार अँड संजय धोटे यांनी उदघाटन प्रसंगी बोलताना सांगितले.नोकारी खु येथे ऐकून १७ बचत काम करत आहे. 

महिलांनी एकमेकांनशी मतभेद न करता चागल्या प्रकारे महिलांनी बचत गट चालवून नाव लौकिक करावे,आगामी काळात बचत गटाला चांगले दिवस येणार आहे.
आपण करत असलेले कार्य समाजा पुढे आदर्श निर्माण करणारे असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले.

कार्यक्रमा प्रसंगी भाजपा नेते वामन तुराणकर,गावच्या सरपंच सौ.लता रामकीसन ऊईके,सचिन गुरनुले,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,ग्रा.प.सदस्य दौलत नैताम,विद्याकांबळे,,कु.बबिता पारधी ग्रा.प.सदस्य सौ.मनिशा मेंढे,ग्रा.प.सदस्य सौ.कौषल्यापरचा,सौ.गीरजाबाई मडावि,सौ.सगीता ठाकरे,सौ.मनिशा मडावि,सौ.विना नौताम,सौ.छायाताई मोहुर्ले,रेखाताई राउत,सुनीताताई ढोले,कर्णुजि शंकर  नन्नावरे,जि.एन पांडे,दीनेश हेपट आदेभीवाजी शेंडे,देवराव ढोले,मारोती साळवे,रामु कोरांगे,रामरुप काश्यप श्रीराम बतकी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार अँड संजय धोटे म्हणाले की नोकारी खु येथे रस्ते,नाली,पिण्याचे पाणी या करिता निधी मंजूर करण्यात आला आहे.
येत्या काळात अजून विकास कामा करिता निधी उपलब्ध करून देणार आहे.
यावेळी महिलांनी गावातील समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या,आमदार अँड संजय धोटे यांनी सर्व समस्या ऐकून सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

मकरसंक्रांत निमित्त गावातील महिलांना आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आले,यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.