जिल्हा परिषद शाळा चिंचाळा(शास्त्री)यांचा आगडावेगडा उपक्रम:बाल आनंद मेळाव्याचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद शाळा चिंचाळा(शास्त्री)यांचा आगडावेगडा उपक्रम:बाल आनंद मेळाव्याचे आयोजन

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर(चिमूर-अरविंद राऊत) : 
जिल्हा परिषद शाळा चिचाळा(शास्त्री) यांचेकडून बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात  विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला या मेळाव्यामध्ये शाळेतील विदयार्थ्यांनी आप आपल्या घरून वेगवेगळ्या प्रकारच्या अल्पउपहार तयार करून शाळेच्या समोर विकण्यासाठी ठेवला हा अल्प उपहार अत्यन्त कमी दराने मदत असल्याने गावकरी लोकांनी नाश्ता करण्यासाठी खूप मोठी गर्दी करून विकत घेतला.

       
प्रत्येक  विद्यार्थ्यांनी वेगवेगळा अल्पोपहार विकण्यासाठी आणलेला असल्याने व विकत घेण्यासाठी गावातील लोकानी केलेल्या गर्दीने या गावातिल परिसराला एक वेगडेच रूप तयार झालेले दिसले.

       
विदयार्थ्यांनी विकलेल्या खाद्य साहित्यातून येणाऱ्या पैशांतून त्याच विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गरजू वस्तू घेण्यासाठी मदत होणार असल्याने या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होऊन एक नवीन व्यवसाय शिकण्याची कला त्यांच्या अंगी येणार आहे .हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणार आहे.

     
या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा चिचाळा(शास्त्री) येथील मुख्यध्यापिका सौ.शहारे व शिक्षिका कु.संध्या गोंडाने यांनी  खूप मेहनत घेतली असून स्वतः आर्थिक सहकार्य केले.यात गावकरी लोकांनी खूप मोठया प्रमाणात पाठिंबा दर्शवला.