गोंडपिपरी भाजपाने गेलेला गड किल्या हाती घेऊन केला पुन्हा केला सर :नगर पंचायत विषय समितीच्या निवडणुकीत भाजपा अविरोध विजयी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरी भाजपाने गेलेला गड किल्या हाती घेऊन केला पुन्हा केला सर :नगर पंचायत विषय समितीच्या निवडणुकीत भाजपा अविरोध विजयी

Share This
-बांधकाम समिती वर चेतनसिहं गौर तर पाणीपुरवठा समिती राकेश पुन विजयी.
-गोंडपीपरी शहरातील १० कोटी रु.च्या पाणी पुरवठयाचा प्रश्न मार्गी लागणार
खबरकट्टा /चंद्रपूर (गोंडपिपरी):
गोंडपिपरी नगर पंचायतीच्या आज झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधी भाजपाने बाजी मारत चार पैकी दोन समित्यांवर अविरोध विजय प्राप्त केला. 

विषय समित्यांपैकी बांधकाम सभापती म्हणून भाजपचे विरोधी गटनेते चेतनसिहं गौर व पाणीपुरवठा सभापती पदी राकेश पून यांची अविरोध निवड करण्यात आली हे विशेष. तर नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष सौ शोभा संकुलवार यांच्याकडे शिक्षण व क्रीडा समितीचा पदभार देण्यात आला असून, महिला व बालकल्याण समितीची निवडणूक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सदर निवडणुकीचे पीठासीन निवडणूक निर्णय  अधिकारी म्हणून मूल चे तहसीलदार राजेश सरवदे यांच्या देखरेखी खाली घेण्यात आली.

निवड झालेल्या दोन्ही नगरसेवकांचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ऍड. संजय धोटे यांनी तसेच अभिनंदन केले आहे. याप्रसंगी मा.सतिश धोटे भाजपा नेते राजूरा, बबन निकोडे तालुकाध्यक्ष,शिवसेना तालुकाप्रमुख सुनील संकुलवार,निलेश संघमवार,साईनाथ मास्टे,अश्विनकुसनाके,संजय झाडे माजी नगराध्यक्ष,फिरोज खान,सरिता पुणेकर, किरण नगारे, सुरेश चरडे, जितेंद्र इटेकर, गणेश डहाळे ,योगेश मुंगले, सुरज भोयर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

मागील वर्षी झालेल्या नागराध्यक्ष निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करत काँग्रेस ने अपक्षांची साथ घेत अवघ्या एका मताने पुढाकार घेत काँग्रेस चे अध्यक्ष व शिवसेनेचे उपाध्यक्ष निवडून आणले होते. त्यानंतर विकासकामांना बगल देत सदर गटात अंतर्गत वादविवाद अनेक वेळा चव्हाटयावर आल्यामुळे  या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला व भाजपाने सरशी साधली हे विशेष.