राजुरा शहरातील मोकाट जनावर - कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा शहरातील मोकाट जनावर - कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (शोएब शेख : राजुरा):

राजुरा शहरात सध्या  मोकाट जनावरे व कुत्र्यांची है दोस असून, जनावरांच्या   मोकाट फिरण्याने  फक्त नागरिकच  नाही  तर भाजीपाला विक्रेतेही त्रस्त झाले आहे. या मोकाट जनावर व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची सर्वस्वी जबाबदारी न. प. प्रशासनाची आहे. 


मात्र न. प. याकडे कान डोडा करीत असल्या मुळे दाद कणाकडं मागाईची सामान्य नागरिक  व भाजीपाला विक्रेत्यासमोर निर्माण झाला असून या मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक व भाजीपाला विक्रेत्यांनी न. प. प्रशासनाकडे केली आहे. 

प्राप्त माहितीनुसार राजुरा शहरातील मुख्य स्तरावर मोठ्या प्रमाणात ठाण  मांडून असतात शहरातील भाजीपाला मार्केट असणाऱ्या रस्त्यावर हि जनावरे ठाण मांडून बसल्यामुळे रहदारी प्रभावित होते शिवाय या जनावरांना रस्त्यावरून हाकलण्याचा प्रयत्न केल्यास हि जनावरे सरळ  भाजीपाला भाजीपाला मार्केट मध्ये घुसतात व भाजी विक्रेत्यांच्या  मालाची नासधूस करतात. त्या  मुळे  व्यापारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे . या जनावरांचा बंदोबस्त करण्याची सर्वसावी जवाबदारी न. प. प्रशासनाची आहे. परंतु न. प. प्रशासनाची याकडे लक्ष नसल्यामुळे दाद कणाकडं मागायची असा प्रश्न भाजीपाला विक्रेत्यांनी न. प. प्रशासना कडे विचारला आहे. तसेच मागील काही दिवसा पासून राजुरा शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे व हि कुत्रे  चालणाऱ्या वाहनावर धावून येत असल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहे.

या मोकाट जनव्वरांना कोडवाड्यात टाकण्याच्या प्रयत्न केल्यास मात्र जनावरांचे मालक हमारी तुमरी वर उतरतात त्या मुळे भाजीपाला विक्रेते त्रास झाले. असून या मोकाट जनावरांवर तात्काळ उपायोजना करावी व या जनावरांना मोकाट सॊडणाऱ्या जनावर मालकावर हि कारवाही करावी करावी तसेच तसेच मोकाट कुत्रांचा हि बंदोबस्त करावा अशी विनंती भाजीपाला विक्रेते व राजुरा नागरिकांनी न. प. प्रशासना कडे केली आहे.