जेसीआय राजुरा प्राईड द्वारे राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जेसीआय राजुरा प्राईड द्वारे राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :(दीपक शर्मा / राजुरा) 

स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय संस्था ज्युनियर चेंबर इंटरनेशनलची स्थानिक शाखा जेसीआय राजुरा प्राईड द्वारे राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी जेसीआय राजुरा प्राईड चे माजी अध्यक्ष जेसी व्यंकटेश गड्डम यांनी विद्यार्थ्यांना धोकेबाजी, असत्य, चोरी आणि प्रलोभनांपासून दूर राहण्याचे तसेच जीवनात इमानदारी, नैतिकमूल्ये आणि समाजाप्रती सन्मानाने वर्तवणूक करण्याची उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना शपथ दिली. 
जेसीआय राजुरा प्राईडचे अध्यक्ष जेसी विशाल शर्मा, माजी अध्यक्ष जेसी श्वेता जयस्वाल, जेसी गोपाल सारडा, जेसी दीपक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे प्राचार्य राऊत सर व प्रकल्प अधिकारी जेसी फैयाज शेख यांचे योगदान लाभले. 

कार्यक्रमाच्या यशश्वीतेकरिता जेसी संदीप जैन, जेसी शंकर झंवर, जेसी राजेश जयस्वाल, जेसी नयना गुप्ता, जेसी बिबा सिंग, जेसी सरिता मालू, जेसी छाया दुधलकर, जेसी लता हडपे, जेसी रंजना नाकतोडे, जेसी प्रज्ञा पाटील, जेसी शारदा गड्डम, जेसी रमेश मंडल, जेसी संदीप खोके, जेसी जितेंद्र केशवानी तथा विद्यालयाचे शिक्षक बंदाली सर, कुंभरे सर, बुटले सर शिक्षकवृंद आणि शिक्षकवृत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.