सावधान : कुणीतरी जाळतंय तुमच्या आमच्या गाड्या -आगलाव्या चोर सीसीटीव्ही मधे रेकॉर्ड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सावधान : कुणीतरी जाळतंय तुमच्या आमच्या गाड्या -आगलाव्या चोर सीसीटीव्ही मधे रेकॉर्ड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

विविध शहरांत गाड्या जाळण्याचे प्रकार वाढले असून चंद्रपूर शहरातही असाच एक प्रकार सीसीटीव्ही मधे रेकॉर्ड झाला आहे.शहरातील प्रतिष्ठित सरकार नगरमधील हिरेन अपार्टमेंटमधील चार दुचाकी अज्ञान व्यक्तीने जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये गाड्या पेटवणारा व्यक्ती स्पष्ट दिसत आहे.

घटना घडल्यानंतर प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, पण नंतर सीसीटीव्ही बघितल्यावर एक व्यक्ती आग लावत असल्याचे दिसून आले.

शहरात काही दिवसांपासून पेट्रोल चोरी, अवैध दारू तस्करी व काही छुपे अवैध धंदे वाढताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अद्याप फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही.
 
शहरातील सरकार नगर या प्रसिद्घ भागात रात्री हिरेन अपार्टमेंटच्या रहिवाशांना धूराचा त्रास जाणवू लागला. काहींना अपार्टमेंटमध्ये शॉर्ट सर्किट तर झाले नाही ना अशी भीती वाटली. नागरिकांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. तेव्हा पार्किंग मधील वाहने जळत असल्याचे दृश्य नागरिकांना दिसले. त्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला परंतु तोवर चार दुचाकी पूर्णतः जळून खाक झाल्या होत्या. घटना मध्यरात्री 2 वाजता घडली. 

कुणी अज्ञातांनी हा प्रकार केला असा दाट संशय अपार्टमेंटच्या नागरिकांना होता, कारण शॉर्ट सर्किट झालं असत तर पूर्ण विद्युत प्रवाह बंद झाला असता पण तसे काही झाले नाही. सीसीटीव्ही बघितल्यावर एक व्यक्ती ही आग लावत असल्याचे दिसून आले.

नागरिकांनी घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली असून सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.