शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, काँग्रेसला साथ द्या :-- माजी आमदार सुभाष धोटे:जिल्हा अध्यक्ष, चंद्रपूर काँग्रेस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, काँग्रेसला साथ द्या :-- माजी आमदार सुभाष धोटे:जिल्हा अध्यक्ष, चंद्रपूर काँग्रेस

Share This
-काँग्रेस कार्यकर्ता तथा सत्कार समारंभ संपन्न 
खबरकट्टा /चंद्रपूर (चेतन खोके):
दिनांक १ फेब्रुवारीवारी २०१९ रोजी दुपारी १२:३० वाजता कोरपणा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे श्रीकृष्ण सभागृहात  राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांची चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नियुक्त झाल्याबद्दल सत्कार समारंभ तसेच कार्यकर्ता बैठकीचे आयोजन उत्साहात संपन्न झाले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहरभाऊ पाऊनकर हे होते चंद्रपूर काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तथा सत्कार मुर्ती माजी आमदार सुभाषभाऊ धोटे होते.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष सुर्यकान्तजी खनके,तालुका अध्यक्ष विठ्ठलरावजी थिप्पे सर,चंद्रपूर जिल्हा म.स.बँकेचे संचालक विजयरावजी बावणे, कोरपणा प.स.श्यामबाबु रणदिवे, संबाजी कोवे, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवचंदजी काळे ,पेचे ताई,मालेकर ताई,मा.जिल्हा परिषद सदस्य उत्तम भाऊ पेचे,पंचायत समीती सदस्य सौ.सिंधुताई आस्वले,तोडासे ताई,महिला अध्यक्ष ललीताताई गेडाम, सेवा दल कोरपणा ता.अध्यक्ष नोगराजी मंगरुळकर सर,कोरपणा नगराध्यक्ष सौ.कांताताई भगत,मा.नगराध्यक्ष सौ.नंदाताई बावणे,मा.उपसभापती रऊफ भाई,कोरपणा उपनगराध्यक्ष मनोहरजी चन्ने, झिबलपाटील जुमणाके,दिनकरपाटील मालेकर,पाशा पटेलजी,दिवाकर बोरडे,घनश्यामभाऊ नांदेकर, वहाफ भाई,मा.राजुरा विधानसभा अध्यक्ष आशीषभाऊ देरकर, एजाजभाई,कोरपणा शहर अध्यक्ष सुनीलभाऊ बावणे,कोरपणा युवक अध्यक्ष ईस्माईल भाई,अल्प संख्या क अध्यक्ष निसार भाई,युवा नेते उमेशभाऊ पालीवार, संजय जाधव,चंपत येडमे,प्रशांत लोडे, रोशन आस्वले,शैलेश लोंखंडे,मुन्ना मासीरकर,श्रीकांत पिंपळकर,मोहुर्ले,आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमात अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी सुभाष भाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला ,कोरपणा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते तथा संघाशी निकटवर्तीय असलेले गणेशभाऊ बोडेकर यांनी विजयरावजी बावणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला यांच्या प्रवेशाने कोरपणा तालुका भारतीय जनता पक्षाला खुप मोठी खिंडार पडेल अशी उपस्थितामध्ये चर्चेला उधाण येत होते,
       आपल्या सत्काराला उत्तर देताना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी देशात, राज्यात आणि जिल्ह्यात काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी आपण पुर्ण ताकदीने पार पाळून जिल्ह्य़ात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ असा आशावाद व्यक्त केला. अध्यक्षीय मार्गदर्शनातून मनोहरजी पाऊनकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी सुभाषभाऊंची जिल्हाध्यक्षपदी केलीली निवड अतिशय योग्य असून माझ्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत मी अनेक जिल्हाध्यक्ष पाहिले परंतु सुभाषभाऊंचा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून जो भव्य दिव्य सत्कार झाला तसा मी कुणाचाही पाहिला नाही. मला विश्वास आहे की सुभाषभाऊंच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल आणि काँग्रेस पून्हा संपूर्ण जिल्ह्य़ात उत्तम कामगिरी करून दाखवेल. 
       नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
       कार्यक्रमाला काँग्रेसचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे संचालक, सदस्य, बाजार समितीचे संचालक, सदस्य, शहरातील गणमान्य व्यापारी, कोरपणा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, शहर काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती, जमाती विभाग, एनएसयुआय तथा काँग्रेस  पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
       संचालन तथा प्रास्ताविक विजयराव बावणे यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ नेते सुरेश पाटील मालेकर यांनी केले.