एसीसी सिमेंट कम्पनिने मागण्या पूर्ण न केल्यास कंपनीच्या मुम्बई कार्यालयासमोर आंदोलन करू:राजू कुकडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एसीसी सिमेंट कम्पनिने मागण्या पूर्ण न केल्यास कंपनीच्या मुम्बई कार्यालयासमोर आंदोलन करू:राजू कुकडे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (घुग्गुस):


एसीसी सिमेंट कम्पनिच्या " नॉट फॉर सेल "  सिमेंट ब्यागा चोरी प्रकरणात आरोपी कंत्राटदार राजू रेड्डी यांच्या साईराज कंपनीला काळ्या यादीत टाका.

कंपनीचे कोल स्टॉक मुळे माऊंट काण्व्हेण्ट.सरस्वती विद्यालय आणि तेलगू शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी  कोल स्टॉक हटवा. 

कम्पनिच्या सिमेंट व कोळसा वाहतूकीमुळे रस्त्याने धूर प्रदूषण होवून शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना नुकसान भरपाई द्या. 

कंपनी कामगार भरतीमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना नौकरी द्या  आणि कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या. 

इत्यादी मागण्या घेवून कम्पनिच्या परिसरात दिनांक 6 व 7  तारखेला धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर एसीसी सिमेंट कम्पनिच्या अधिकारी यांना पुन्हा निवेदन देवून  वरील मागण्या एका महिन्यात पूर्ण करा अन्यथा  मुम्बईच्या एसीसी सिमेंट कंपनी  कार्यालयासमोर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.  

या शिवाय मनसे तर्फे कोल स्टॉक हटविण्यासाठी या परिसरातील शाळेच्या विद्यार्थी व पालकांच्या स्वाक्षरी मोहीम द्वारे प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांना कम्पनीवर करवाई करण्यास भाग पाडू असा इशारा सुद्धा देण्यात आला या प्रसंगी  मनसेचे राजू कुकडे. बळीराम शेळके. रमेश कालबान्धे.गुरुदेव मौगरे.पीयूष धूपे. वनिता चिलके. कविता घोणमोडे. सुमन चामलटे.कोटेश्वारि गोहने.सूरज धोटे इत्यादींची उपस्थिती होती.