१६ फेब्रुवारीला शेतकरी संघटनेची बैठक शिवसेना नेते बबन उरकुडे प्रवेश करणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

१६ फेब्रुवारीला शेतकरी संघटनेची बैठक शिवसेना नेते बबन उरकुडे प्रवेश करणार

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके - राजुरा):

राजुरा तालुका शेतकरी संघटनेची बैठक दिनांक १६ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता बामनी रस्त्यावरील उध्दव मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार अँड. वामनराव चटप राहणार असून बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजुरा तालुका शेतकरी संघटना, शेतकरी युवा आघाडी, महिला आघाडी यांनी संयुक्तपणे केले आहे.
     
या बैठकीत राजुरा तालुका शिवसेना प्रमुख व तडफदार नेते बबनभाऊ उरकुडे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. मागील जिल्हा परिषद निवडणूकीत गोवरी- सास्ती क्षेत्रातून बबनभाऊ उरकूडे यांनी दुस-या क्रमांकाची तीन हजारावर मते घेतली होती परंतू, त्यांचा निसटता पराभव झाला होता. या भागातील युवकांचे लोकप्रिय नेते म्हणुन त्यांची ख्याती असुन जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा रस्त्यावर उतरुन व मोर्चे काढून संघर्ष केला आहे. अँड. वामनराव चटप यांचे संघर्षशिल व्यक्तिमत्व हेच शेतकरी व जनतेला न्याय देण्यास समर्थ असुन त्यांची  कार्यप्रणाली व शेतकरी संघटनेवर विश्वास व्यक्त करीत बबनभाऊ उरकुडे शेकडो तरुणांसह शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राजुरा तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन शेतकरी संघटना प्रबळ होणार असल्याचे समजले जात आहे.
      
या बैठकीत जबरानज्योत शेतक-यांचा पट्टयाचा प्रश्न, गैरआदीवासींना पट्टे मिळण्याकरीता तिन पिढ्यांची अन्यायकारक अट , मुर्ती येथील विमानतळ प्रकल्पग्रस्त कोलाम व गैरआदीवासी शेतक-यांना योग्य मोबदला मिळणे, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतक-यांवरील अन्याय, शेतमालाचा उत्पादनखर्च व सरकारची भूमिका, आगामी निवडणुक व संघटनात्मक बाबी इत्यादीविषयी सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला प्रभाकर दिवे,अरुण पाटील नवले,अँड.मु.रा. देवाळकर, अनिल ठाकुरवार, बाजार समिती सभापती कवडु पोटे,नारायण गड्डमवार, रमेश नळे, हरीदास बोरकुटे, प्रभाकर ढवस, दिनकर डोहे,भाऊजी किन्नाके, संजय करमनकर,दिलीप डेरकर, तेजस्विनी कावळे, सिंधू बारसिंगे, दिपाली हिंगाणे यांचेसह अनेक पदाधिकारी व सरपंच उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.