जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघातर्फे मोदी ची पूजा करून घातले साकडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघातर्फे मोदी ची पूजा करून घातले साकडे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सफाई कामगारांचे पाय धुवून वंदन केले. यातून सफाई कामगारांची पूजा करीत असल्याचे मोदी यांनी दर्शविले. त्यानंतर येथील महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी सफाई कामगारांनी पंतप्रधान मोदी यांना आरती ओवाळली. जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात या प्रतिकात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांना अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. महानगरपालिका, वैद्यकीय महाविद्यालय आणि शासनाच्या इतर विभागात काम करणाऱ्या  कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. आरोग्य विभागातील कामगारांना तर मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. एकीकडे अत्यल्प वेतन देण्यात येते. तर दुसरीकडे चार-चार महिने वेतनसुद्धा दिले जात नाही. त्यामुळे सफाई कामगार आर्थिक अडचणीत आले आहेत.
 पंतप्रधान मोदी यांनी सफाई कामगारांची पूजा करणे स्वागतार्ह आहे. मात्र, निव्वळ कामगारांची पूजा करून काहीही साध्य होणार नाही-पप्पू देशमुख ;अध्यक्ष जनविकास सेना 

मागील अनेक वर्षांपासून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नाही. कामगारांना प्रत्येक महिन्याला दहा तारखेच्या आत वेतन देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, वेतन थकीत ठेवले जाते. कामगारांना हक्काच्या सुट्ट्या नाही. महिला कामगारांना सुविधा नाही. सुरक्षेची साधना नाहीत. सफाई कामगार व इतर कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघातर्फे मोदी यांची पूजा करून साकडे घातले आहे.

पंतप्रधानांनी सफाई कामगार, इतर कंत्राटी कामगारांविषयी आस्था असेल, तर किमान वेतन, दर महिन्याला नियमित पगार, हक्काच्या सुविधा पुरविण्यासंबंधी तातडीने पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी कामगारांनी व्यक्त केली.