भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या?

Share This
खबरकट्टा / विशेष :

आपण जन्माला येताच आपल्याला जात आणि धर्म चिकटतो. फारच कमी लोक असे असतात जे जात आणि धर्माचा रकाना रिकामा ठेवतात. आज आपण एका अशा महिलेला भेटणार आहोत जिने फक्त जात आणि धर्मच लावणं सोडलेलंच नाही, तर भारतातलं पाहिलं ‘No Caste, No Religion’ सर्टिफिकेट मिळवलं आहे.

तिरुपत्तुर, वेल्लोर येथील स्नेहा यांनी हे सर्टिफिकेट मिळवलं आहे. स्नेहा या स्वतः वकील आहेत. बालपणापासून त्यांच्या आईवडिलांनी जन्माच्या दाखला असो किंवा शाळेतील नाव नोंदणी किंवा इतर कागदपत्रांवर जात-धर्म नोंदवलेला नाही. आईवडिलांचे हेच संस्कार स्नेहा यांनी आत्मसात केले आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या कोणत्याच कागदपत्रांवर जात धर्म नोंदवलेला नाही. त्यांची ओळख ‘भारतीय’ अशी आहे.
   
एखाद्याने जात आणि धर्म न लिहिण्याचं ठरवलं तरी हे सहज शक्य नाही. कारण काही कागदपत्रांमध्ये जात-धर्म लिहिणं बंधनकारक असतं. हेच लक्षात घेऊन स्नेहा यांनी एक पाऊल पुढे जायचं ठरवलं. ‘जात आणि धर्म नसलेला’ या सर्टिफिकेटसाठी त्यांनी अर्ज केला. हे वर्ष होतं 2010.

तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे सर्टिफिकेट मिळवणं सोप्पं नव्हतं. समस्या लोकांच्या विरोधाची नव्हती, तर समस्या होती या प्रकारचं सर्टिफिकेट यापूर्वी कधीच कोणी मागितलं नव्हतं. शेवटी अशाही प्रकारचं सर्टिफिकेट मिळू शकतं हे सिद्ध झालं आहे. यासाठी स्नेहा यांनी सरकारपुढे आपली बाजू खंबीरपणे मांडली आहे.

जातीचे सर्टिफिकेट आपण सगळ्यांनीच पहिले असतील, पण जात नसलेल्या सर्टिफिकेटची ही पहिलीच वेळ आहे.