देशाची व राज्याची सत्ता हस्तगत करा,सर्व समस्या सुटणार:अॅड.बाळासाहेब आंबेडकर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देशाची व राज्याची सत्ता हस्तगत करा,सर्व समस्या सुटणार:अॅड.बाळासाहेब आंबेडकर

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर (चिमूर) :

दुर्लक्षित व वंचित समाजाचे घटक असलेल्यां,माना,गोवारी,हलबा,ढिवर(भोई),धनगर समाज बांधवांच्या माहा मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधतांना,अॅड.बाळासाहेब आंबेडकर गरजले,वंचित समाज बांधवांनों भारत देशाची व महाराष्ट्र राज्याची सत्ता संपादन करा,तुमच्या सर्व समस्या,न घुमवता वेळत सोडवू.सभा स्थळी,अॅड.बाळासाहेब आंबेडकर,माजी राज्यमंत्री डाॅ.रमेशकुमार गजबे,माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम,अण्णासाहेब पाटील,संजय हेडावू,सागर दवासे,अॅड.धनराज वंजारी,कुशल मेश्राम,अरविंद सांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अॅड.बाळासाहेब आंबेडकर संबोधतांना म्हणाले,जे लोक खोटे बोलून सत्तेवर येतात,ते लोक वंचित समाज बांधवांच्या हिताचे धोरणे कधीच राबवीत नाही.तद्वतच वंचित समाजाचे कल्याण व उन्नती होईल अशा पध्दतीचे निर्णय घेत नाही.म्हणून या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या भोंदगीरी पासून तुम्ही सावध असले पाहिजे असे आव्हान केले.पुढे बोलतांना म्हणाले वंचित आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करा व निवडून द्या,आम्हीं सर्व वंचितांचं हित जपू,उन्नती करु.या सभेत माजी राज्यमंत्री डाॅ.रमेसकुमार गजबे यांनी गांभीर्य पुर्वक आवश्यक असे दमदार मार्गदर्शन केले.याच बरोबर माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम,अण्णासाहेब पाटील लातूर,अॅड.धनराज वंजारी वर्धा,संजय हेडावू,नागपूर,सागर दवासे यांच समयोचित मार्गदर्शन झाले.


कार्यक्रमाचे सयोजक अरविंद सांदेकर यांनी समाजावर होत असलेला अन्याय व्यक्त केला,व आपल्या समाजा प्रती न्यायसंगत भुमिका पार पाडण्यासाठी व सर्व वंचित समाजावरील अन्याय दुर करण्यासाठी,बहुजन वंचित आघाडीत सामील झालो आहे,असे सांगितले.

चिमुरच्या याच सभेत,चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेञाचे उमेदवार म्हणून डाॅ.रमेशकुमार गजबे यांच्या नावाची घोषणा,अॅड.बाळासाहेब आंबेडकरांनी केली.तर वर्धा लोकसभा उमेदवारी अॅड.धनराज वंजारी यांना दिली.

माजी प्राचार्य वासुदेव श्रिरामे यांनी कार्यक्रमाचे संवेदनक्षम प्रास्ताविक केले,तर कार्यक्रमाचे संचालन प्रा.दिनकर चौधरी यांनी केले.आणि खापरी येथील सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश मेश्राम यांनी आभार मानले.