ग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू झाला पाहिजे :माजी आमदार. वामनराव चटप ; कोरपना येथे रबरी बॉलचे खुले सामने - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू झाला पाहिजे :माजी आमदार. वामनराव चटप ; कोरपना येथे रबरी बॉलचे खुले सामने

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना (चेतन खोके):

युवकांनी क्रीडा क्षेत्रात मागे न राहता कोणत्याही खेळामध्ये भाग घेऊन आपले नाव लौकीक करावे असे प्रतिपादन माजी आमदार वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य मुस्लिम संघर्ष समिती क्रिकेट क्लब,कोरपना  च्या वतीने आयोजित कोरपना येथे  भव्य रबरी बॉलचे खुले सामने या कार्यक्रमातील उदघाटनीय भाषणात व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोरपना नगर पंचायत उपाध्यक्ष मनोहर चन्ने होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले,माजी प,स,सदस्य रमाकांत मालेकर,नगरसेवक सुभाष तुराणकर,अविनाश मुसळे,विजय जीवने, पत्रकार अमोल आसेकर,शौकत अली,अब्दुल रहेमान,गजानन पत्रीवार ,इसाक शेख,निसार शेख , अफरोज अली आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की क्रिकेट या खेळामुळे चागला व्यायाम होत असल्याने क्रिकेट खेळणे चांगले आहे,त्याचबरोबर अशाच सामन्यांमधून चांगला खेळाडू घडत असतो. जीवन हे क्रिकेट सारखे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे संचलन अविनाश मुसळे यांनी केले,कार्यक्रमाला मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.