चिमूर येथे घोडा यात्रा महोत्सव प्रारंभ :महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची विशेष उपस्थिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर येथे घोडा यात्रा महोत्सव प्रारंभ :महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची विशेष उपस्थिती

Share This
-लक्ष्मीनारायण मंदिराची प्रतिकृती यात्रेचे आकर्षन
खबरकट्टा / चंद्रपूर : (अरविंद राऊत / चिमूर):
महाराष्ट्र राज्या तसेच लगतच्या राज्यात जागृत देवस्थान म्हणुन नावलौकीक आहे . चिमूरच्या आराध्य दैवत श्रीहरी बालाजीची प्रसिद्ध ३९२ वी मुख्य घोडारथ यात्रा  आज दिनांक १७ तारखेला  होणार असल्याने या महोत्सवा करीता  महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार  रावल विशेष उपस्थित राहणार आहे. 

          
तिनशे एक्यान्नव वर्षा पासुन चिमूर येथील घोडा यात्रा महोत्सव होत असुन या वर्षी सुद्धा या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . श्रीहरी बालाजी देवस्थानच्या वतीने घोडायात्रा महोत्सवास  मिती माघ शुद्ध पंचमी १० फरवरी रोज रविवार पासुन नवरात्र प्रांरभ झाली आहे .

 मिती माघ कुष्ण प्रतिपदा २० फरवरी बुधवार पर्यंत चालणाच्या या नवरात्रोत ह . भ .प .विनोद बुवा खोंड महाराज, उमरेड यांचे रोज रात्रो ८ .३० ते १० .३० वाजेपर्यंत नारदिय किर्तन कार्यक्रम होणार आहे . तसेच आज  १७ फरवरीला रात्रो ७ ते ९ वाजेपर्यंत संगितमय भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .